Astra news network podcast

ए एन एन न्यूज नेटवर्क: प्रादेशिक बातम्या दिनांक: १० जून २०२५


Listen Later

रायगडमध्ये खाण रॉयल्टी घोटाळा झाल्याचा आरोप

 रायगड जिल्ह्यात सहाशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा खाण रॉयल्टी घोटाळा झाला असल्याचा आरोप होत आहे. याची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वनमंत्री गणेश नाईक आणि महसूलमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे यांनी या चौकशीचे आदेश दिले आहेत.  काही बड्या कंपन्यांनी हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप केला जात असून. ऊरण, पनवेल क्रशर असोसिएशनचे सचिव अतुल भगत यांनी याप्रकरणी पुढील पुरावे सादर करण्याची तयारी दर्शवली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये रेडझोन मधील भूखंडांची मोठ्या प्रमाणावर विक्री

पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडे परिसरात रेडझोनमध्ये भूखंड व्यवहार करून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असून. राज्य शासनाने रेडझोन संरक्षित क्षेत्रात भूखंड खरेदी-विक्रीवर बंदी घातली असतानाही, काही भूमाफिया आणि एजंट्स  नागरिकांना खोटे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करत आहेत असा आरोप भाजप पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस सचिन काळभोर यांनी केला असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी एजंट्स आणि बिल्डर्सवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

एटीएम छेडछाड करून नागरिकांना गंडा घालणारे भामटे अटकेत

एटीएममध्ये छेडछाड करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संतोष कुमार किशोरीलाल सरोज आणि प्रदीप कुमार नंदकिशोर मौर्या या दोन आरोपींना पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठे येणारया नागरिकांचे पैसे एटीएममध्ये अडकवून नंतर ते काढून घेत असत. बँकेच्या एटीएममध्ये सापळा रचून पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम, विविध बँकांची चार एटीएम कार्ड्स आणि एटीएममध्ये छेडछाड करण्यासाठी वापरलेली काळी पट्टी जप्त करण्यात आली आहे.

बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई

 नवी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांवर मोठी कारवाई करत, पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या घुसखोरांना बनावट भारतीय कागदपत्रे मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पनवेल येथील एका फ्लॅटमध्ये हे घुसखोर बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईतून बनावट पासपोर्ट आणि जन्म प्रमाणपत्रे बनवणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश झाला आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात विविध कार्यक्रम

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये नळस्टॉप येथे सीएनजी रिक्षाचालकांसाठी मोफत सीएनजी कुपन वाटप, तसेच जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धा आणि शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप या कार्यक्रमांचा समावेश होता.

या होत्या आजच्या ठळक बातम्या. अधिक माहितीसाठी ऐकत राहा आकाशवाणी पुणे.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Astra news network podcastBy ann