Google Form ही गूगल कंपनी मार्फत दिली जाणारी मोफत सेवा आहे. गूगल फॉर्म ऑनलाईन तयार करू शकतो. तसेच गूगल फॉर्म चा वापर वापरकर्त्याची माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. गूगल फॉर्म मध्ये प्रश्न आणि पर्याय दिले जातात. हे सर्व ऑनलाईन तयार केलेले गूगल फॉर्म Google Drive मध्ये स्टोअर होतात. गूगल ड्राईव्ह ही गूगल मार्फत दिलेली मोफत सेवा आहे. ह्यामध्ये क्लाऊड-आधारित स्टोरेज सेवा दिलेली असते.