जर आपण एक स्मार्टफोन user असाल तर पॉडकास्ट बद्दल आपण ऐकलं असेल किंवा बघितले तरी असेल,कारण भारतामध्ये भरपूर प्लॅटफॉर्म या पॉडकास्ट पद्धतीचा वापर करत आहेत,जसं अमेरिका, युनायटेड किंगडम अशा विकसित देशांमध्ये पॉडकास्ट हा विषय खूप पापुलर आहे पण इंडिया मध्ये या प्रकाराची just सुरुवात झाली आहे असे आपण म्हणू शकतो,भारतातील बहुतेक लोकांना पॉडकास्ट या विषयाबद्दल माहिती नाही जर तुम्हाला पण या विषयाबद्दल माहिती नसेल की पॉडकास्ट नेमकं काय आहे तर काळजी करू नका कारण पॉडकास्ट माध्यमातूनच या विषयाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे.