आनंदी जीवन

आनंदी जीवन

By Sunita NakateEducationSelf-Improvement
Download on the App Store

आनंदी जीवन episodes

  • दुर्गा स्तोत्र
    दुर्गा स्तोत्र
    श्रीगणेशाय नमः । श्री दुर्गायै नमः ।
    नगरांत प्रवेशले पंडुनंदन । तो देखिले दुर्गास्थान ।
    धर्मराज करी स्तवन । जगदंबेचे तेधवा ॥ १ ॥
    जय जय दुर्गे भुवनेश्वरी । यशोदा गर्भ संभवकुमारी ।
    इंदिरा रमण सहोदरी । नारायणी चंडिकेंऽबिके ॥ २ ॥
     जय जय जगदंबे विश्र्व कुटुंबिनी । मूलस्फूर्ति प्रणवरुपिणी ।
    ब्रह्मानंदपददायिनी । चिद्विलासिनी अंबिके तू ॥ ३ ॥
    जय जय धराधर कुमारी । सौभाग्य गंगे त्रिपुर सुंदरी ।
    हेरंब जननी अंतरी । प्रवेशीं तू आमुचे ॥ ४ ॥
    भक्तह्रदयारविंद भ्रमरी । तुझे कृपाबळे निर्धारी ।
    अतिगूढ निगमार्थ विवरी । काव्यरचना करी अद् भुत  ॥ ५ ॥
    तुझिये कृपावलोकनेंकरुन । गर्भांधासी येतील नयन ।
    पांगुळा करील गमन । दूर पंथे जाऊनी ॥ ६ ॥
    जन्मादारभ्य जो मुका । होय वाचस्पतिसमान बोलका ।
    तूं स्वानंदसरोवर मराळिका । होसी भाविकां सुप्रसन्न ॥ ७ ॥
    ब्रह्मानंदे आदिजननी । तव कृपेची नौका करुनि ।
    दुस्तर भवसिंधु उल्लंघूनी । निवृत्ती तटां जाइजे ॥ ८ ॥
    जय जय आदिकुमारिके । जय जय मूलपीठनायीके ।
    सकल सौभाग्य दायीके । जगदंबिके मूलप्रकृतिके ॥ ९ ॥
    जय जय भार्गवप्रिये भवानी । भयनाशके भक्तवरदायिनी ।
    सुभद्रकारिके हिमनगनंदिनी । त्रिपुरसुंदरी महामाये ॥ १० ॥
    जय जय आनंदकासारमराळिके । पद्मनयने दुरितवनपावके ।
    त्रिविधतापभवमोचके । सर्व व्यापके मृडानी ॥ ११ ॥
    शिवमानसकनकलतिके । जय चातुर्य चंपककलिके ।
    शुंभनिशुंभदैत्यांतके । निजजनपालके अपर्णे ॥ १२ ॥
    तव मुखकमल शोभा देखोनी । इंदुबिंब गेले विरोनी ।
    ब्रह्मादिदेव बाळें तान्ही । स्वानंदसदनी निजविसी ॥ १३ ॥
    जीव शिव दोन्ही बाळकें । अंबे त्वां निर्मिली कौतुकें ।
    स्वरुप तुझे जीव नोळखे । म्हणोनि पडला आवर्ती ॥ १४ ॥
    शिव तुझे स्मरणीं सावचित्त । म्हणोनि तो नित्यमुक्त ।
    स्वानंदपद हातां येत । तुझे कृपेनें जननिये ॥ १५ ॥
    मेळवूनि पंचभूतांचा मेळ । त्वां रचिला ब्रह्मांडगोळ ।
    इच्छा परततां तत्काळ । क्षणें निर्मूळे करिसी तूं ॥ १६ ॥
    अनंत बालादित्यश्रेणी । तव प्रभेमाजी गेल्या लपोनि ।
    सकल सौभाग्य शुभकल्याणी । रमारमणवरप्रदे ॥ १७ ॥
    जय शंबरि पुहर वल्लभे । त्रैलोक्य नगरारंभस्तंभे ।
    आदिमाये आत्मप्रिये । सकलारंभे मूलप्रकृती ॥ १८ ॥
    जय करुणामृतसरिते । भक्तपालके गुणभरिते ।
    अनंतब्रह्मांड फलांकिते । आदिमाये अन्नपूर्णे ॥ १९ ॥
    तूं सच्चिदानंदप्रणवरुपिणी । सकल चराचर व्यापिनी ।
    सर्गस्थित्यंत कारिणी । भवमोचिनी ब्रह्मानंदे ॥ २० ॥
    ऐकोनि धर्माचे स्तवन । दुर्गा जाहली प्रसन्न ।
    म्हणे तुमचे शत्रू संहारीन । राज्यीं स्थापीन धर्माते ॥ २१ ॥
    तुम्ही वास करा येथ । प्रगटी नेदीं जनांत ।
    शत्रू क्षय पावती समस्त । सुख अद् भुत तुम्हां होय ॥ २२ ॥
    त्वां जें स्तोत्र केलें पूर्ण । तें जे त्रिकाल करिती पठन ।
    त्यांचे सर्व काम पुरवीन । सदा रक्षीन अंतर्बाह्य ॥ २३ ॥
    ॥ इति श्रीयुधिष्ठिरविरचितं श्रीदुर्गा स्तोत्रं संपूर्णम् ॥
    युधिष्ठिराने दुर्गादेवीचे स्तवन केले आणि युद्धांत विजय
    मिळावा असा वर मागितला. देवी या स्तवनाने प्रसन्न झाली
    व युधिष्ठिराला तूं युद्धांत विजयी होशील असा वर दिला.
    पुढे देवीने असे सांगितले की, तूं केलेल्या या स्तोत्राचे जे
    त्रिकाल पठन करतील त्यांच्या मी सर्व मनोकामना पूर्ण करीन.
    24 min
  • 10 सिक्रेट्स ऑफ सक्सेस अँड इनर पीस-यशस्वी आणि समाधानी जीवनासाठी दहा रहस्ये -2
    10 सिक्रेट्स ऑफ सक्सेस अँड इनर पीस-यशस्वी आणि समाधानी जीवनासाठी दहा रहस्ये -2 या पुस्तकातील दुसऱ्या रहस्य आहे, तुमच्या आतील संगीत जिवंत ठेवा.
    18 min
  • 10 सिक्रेट्स ऑफ सक्सेस अँड इनर पीस-यशस्वी आणि समाधानी जीवनासाठी दहा रहस्ये -1
    10 सिक्रेट्स ऑफ सक्सेस अँड इनर पीस-यशस्वी आणि समाधानी जीवनासाठी दहा रहस्ये -1
    या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर व्हेन डब्ल्यू डायर आणि या पुस्तकाचा अनुवाद केला आहे विद्या अंबिके यांनी. यातील पहिलं रहस्य आहे प्रत्येक गोष्टीसाठी खुलं पण कुठलीच असती नसणार मन
    22 min
  • जगप्रसिद्ध पुस्तकांचा सारांश मराठीतून- Man's search for meaning
    काहीतरी वेगळं तीच व्यक्ती करते जिच्याकडे काही स्वप्नं, जिद्द, आशा आकांक्षा असतात.
    मनुष्य जेव्हा जन्मतो तेव्हा त्याच्या मनाची पाटी कोरी असते. परंतु वय परत्वे त्याच्या मनातील इच्छा आकाशांना धुमारे फुटायला लागतात. प्रत्येक व्यक्तीच जगण्यासाठी काहीतरी कारण असतच. अमानुष अशा यमयातनांनी भरलेल्या छळ छावणी मध्ये लेखकाच्या डोळ्यासमोर अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला. तरीही लेखकाने आपली आशा, मनोधैर्य सोडलं नाही. कारण लेखकासमोर जिवंत राहण्यासाठी काही एक कारण होतं. तर जाणून घेऊया ते कारण काय होतं?दुसऱ्या महायुद्धामध्ये या सर्व कैद्यांना ठेवण्यासाठी काही कॅम्प बनवले होते आणि त्यापैकी एका कॅम्पमध्ये सायकॉलॉजिस्ट व डॉक्टर व्हिक्टर फ्रॅंकल होते. ते तीन वर्ष तिथे होते तिथे त्यांनी जे काही पाहिलं, सहन केलं त्या सगळ्या अनुभवांवर आधारित जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिलं ज्या पुस्तकाच्या करोडो प्रती विकल्या गेल्या. अनेक भाषांमध्ये ते पुस्तक अनुवादित झाले. तर जाणून घेऊया या पुस्तकाचा सारांश.
    8 min
  • The power of silence book summary जगप्रसिद्ध पुस्तकांची सामरी मराठीतून
    शांत राहण्यामध्ये एवढं काय विशेष आहे?
    पंचमहाभूतांनी बनलेल्या आपल्या शरीरामध्ये पाच कर्मेंद्रिये आणि पाच ज्ञानेन्द्रिये आहेत आणि त्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी जीभ ही एक आहे. देवाने मानवाला वाणीचे वरदान दिले आहे. व्यक्ती जर चुकीचे बोलत असेल तर आपण त्याला म्हणतो तुझ्या जिभेला काही हाड आहे का? परंतु त्याच वाणीने काही चांगलं बोललं, एखाद विद्वत्ता पूर्ण भाष्य केलं तर त्या व्यक्तीला सन्मानाने वागवलं जातं.
    आपल्या भारतीय परंपरेमध्ये मौनी एकादशीला फार महत्त्व आहे याचं कारण असं की जिभेला एक संदेश असतो की तू फार बोलू नकोस शांत रहा. या एकादशीच्या निमित्ताने वाणीचा संयम सांगितलेला आहे.
    या पुस्तकातून लेखकाने शांत कसं राहायचं कधी गप्प राहायचं आणि कधी शांत राहायचं ते सांगितलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे
    The power of silence
    Author: Robert Cardinal Sarah
    13 min
  • जगप्रसिद्ध पुस्तकांचा सारांश मराठीतून one percent solution
    काय तुम्हाला तुमचे जीवन आणखी चांगले व्हावे असे वाटते का?
    नोकरीमध्ये आणखी नेक्स्ट लेवल ला जावेसे वाटते का?
    तुम्हाला तुमचा बिझनेस आणखी वाढवायचा आहे का? तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे.
    जीवनात आणि आपल्या बिजनेस मध्ये यशस्वी होण्याचा रस्ता हे पुस्तक दाखवतं.
    आपल्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी एक पॉवरफुल सोल्युशन या पुस्तकामध्ये आहे. लेखकाने जीवनातील अनुभव व संशोधनावरून हे पुस्तक लिहिलेलं आहे.
    या पुस्तकाचं नाव आहे one persent solution. आणि याचे लेखक आहेत.
    टॉम कॉनेलन
    14 min
  • जगप्रसिद्ध पुस्तकांची समरी मराठीतून
    17 Anti-procastination hacks
    By Dominic Mann
    Australian author
    जगातील प्रत्येक व्यक्तीला काम टाळण्याची थोडीफार सवय असतेच. एखादं काम टाळलं जातं किंवा चालढकल केली जाते. कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत किंवा विसरली जातात.
    प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असतं परंतु यशस्वी होण्यासाठी आपण हातात घेतलेलं काम वेळेवर पूर्ण करणे आवश्यक असतं. ही कला ज्यांना जमते त्याच व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतात.
    या पुस्तकांमध्ये याच महत्त्वाच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत त्या आपल्याला काम टाळण्याच्या सवयी पासून दूर करू शकतात. प्रत्येक काम करताना आनंदात मौजमस्तीत आणि वेळेवर कसं पूर्ण करायचं हे या पुस्तकांमध्ये लेखकाने खूप छान पद्धतीने सांगितलेला आहे.
    11 min
  • मानसशास्त्राचे जनक- पतंजली ऋषी, पातंजल योगसूत्रे
    जवळपास अडीच हजार वर्षापूर्वी 196 सूत्रे असलेला पातंजल योगसूत्रे हा ग्रंथ लिहिलेल्या पतंजली ऋषींची ओळख आणि पातंजल योगसूत्रे या ग्रंथातील सूत्रांचा अर्थ या सिरीज मधून सांगत आहे. हे विवेचन योगाचार्य डॉ विश्वास व. मंडलिक यांच्या पातंजल योग सूत्रे या पुस्तकातील आहे.
    2 hr 13 min

About आनंदी जीवन

From the publisher's feed

नमस्कार मी सुनिता नकाते आनंदी जीवन या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून मला महाराष्ट्रातील एक लाख महिलांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करणं हा माझा ध्यास आहे. आणि त्या…