आयुष्य म्हणजे पाणी , प्रवाह मिळेल तसं वाहवत जाणार , कधी न थांबणार.
आयुष्य म्हणजे शाळा , शेवट पर्यन्त शिकत राहायच, प्रत्येक वळणावर परीक्षा देत राहायच.
आयुष्य म्हणजे चांगले तर कधी वाईट अनुभव घेते राहायचे, आणि दुसर्यांनाही देत राहायचे.
आयुष्यावर बोलू काही
प्रवाहाबरोबर वाहवत जाई
कधी शांत तर कधी खळखळ
आयुष्यावर बोलू काही
अशी शाळा ज्याला वर्गच नाही
परीक्षा मात्र रोजच होई
आयुष्यावर बोलू काही
अनुभव याचा खूप निराळा
कधी चेहऱ्यावर हसू येई
कधी अश्रूंची फुले होई
आयुष्यावर बोलू काही.
आयुष्य हे असं जगावं
मेल्यावरही जिवंत राहावं
आयुष्याने पुन्हा म्हणावं
आयुष्यावर बोलू काही, आयुष्यावर बोलू काही.
मला वाटत आयुष्य असं जगावं कि मेल्यावरही जिवंत राहाव.
मिळालेल्या सर्व अनुभवातून शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहायचे , कधी कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची, आपल्याकडे जे आहे त्यातून जमत असेल तर दुसऱ्यांना मदत करायची. प्रवास हा खडतर आहे, आणि तोच कसा सुखकर होईल त्याचा सतत प्रयत्न करत राहायचे .