Anandache Dohi

Atmarangi Dang Pari Sada Sajag - Dattaprasad Joshi


Listen Later

आत्मरंगी दंग परि सदा सजग

मूर्त प्रेमानंद प्रभू परमानंद


अज्ञ मतिमंद मनी सदा द्वंद्व

त्यां सेववी मकरंद ईश्वरी प्रेमाचा


प्रेममकरंदाची लावूनिया गोडी

हळूहळू तोडी निरगाठी मनाच्या


दावी सत्य ईश हृदयीचा परमेश

ना उरवी लवलेश व्यर्थ कल्पनेचा


सगुण सद्गुरू तोचि तो श्रीहरी

दावी याची परी आपुल्या जीवनाने


स्वानुभवाचे देऊनिया बीज

करी तजवीज कल्याणाची आमुच्या


प्रभू हाचि शंकर सदा शुभंकर

शिवरूप भास्कर नुरवी वार्ता दिवसरात्रीची

- दत्तप्रसाद जोशी

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Anandache DohiBy Saurabh Kapoor