Anandache Dohi

Avadhutananda Parmananda Sadhgururaya Krupa Kari


Listen Later

अवधूतनंदा परमानंदा सद्गुरुराया कृपा करी

माझे चित्त स्थिर करी

दयासागरा करुणाकरा प्रेममूर्ती कृपा करी

माझे चित्त स्थिर करी

ज्ञानसागरा सत्यवक्त्या अज्ञानहर्त्या कृपा करी

माझे चित्त स्थिर करी

सगुणमूर्ती हरीस्वरूपा सत्य ईश्वरा कृपा करी

माझे चित्त स्थिर करी

दत्तरूपे कार्यकर्त्या स्फूर्तीदात्या कृपा करी

माझे चित्त स्थिर करी

नित्यनूतन नित्यानंदा सदानंदा कृपा करी

माझे चित्त स्थिर करी

तव चरणी मम चित्त जडवुनी मम ह्रदयी तू वास करी

माझे चित्त स्थिर करी

तव प्रेमी मज पूर्ण बुडवुनी मम प्रेमा वाहते करी

माझे चित्त स्थिर करी

सकल कर्त्या धर्त्या दात्या अभंग मजवरी कृपा करी

माझे चित्त स्थिर करी

।। हरी ओम तत सत परमानंद ।।


By Dattaprasad Joshi

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Anandache DohiBy Saurabh Kapoor