Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast

"बा का रं का" - A special Toy-kit by Swaarka [स्वार्क] with Chaitrali Rahalkar


Listen Later

कोरोनाच्या कठीण काळात ज्या काही अडचणींचा सामना आपण केला आणि करतो आहोत त्यामध्ये प्रामुख्याने "screen addiction " ही फारच गंभीर समस्या आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय असतात हे आपण आधीही मुक्ता ताईकडून जाणून घेतलं होतं . समस्या आहे; मुलांच्या दृष्टीने तर अगदी काळजीचीच बाब आहे; हे तर कळतंय पण नेमकं कसं बाहेर काढायचं मुलांना यातून? , काय पर्याय आहेत ? त्यातही मुलं लगेच बोअर होतात मग काय करायचं ? खेळण्यांवर इतका खर्च करायचा आणि ते एकदोनदा खेळून मुलं सोडून देतात आणि घरात फक्त अडगळ आणि पसाऱ्याला कहार होतो नाही का ? डोन्ट वरी मंडळी आपल्या या मराठी पॉडकास्ट मध्ये मी तुमची होस्ट शिल्पा, आज या सगळ्यांवर सोल्युशन काढलेल्या आणि मुलां- पालकांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांमधून काम करणाऱ्या, एका संस्थेच्या एकदम हटके आणि तितक्याच उपयुक्त अशा; एका खास मुलांसाठी बनवलेल्या खूप छान "toykit " ज्याला ते "बा का रं का" असं म्हणतात त्या विषयी माहिती द्यायला माझ्या एका मैत्रिणीला घेऊन आलेय !! संस्थेचं नाव आहे "स्वार्क " आणि मैत्रीण जी या संस्थेची co founder आहे ती आहे चैत्राली रहाळकर !!! चैत्राली आज सगळ्या पालकांचा मोठा प्रश्न सोडवायला आणि तिच्या संस्थेच्या या आगळ्यावेगळ्या नवीन उपक्रमाविषयी विषयी माहिती द्यायला खास आलीये; तर जाणून घेऊया काय आहे या "स्वार्क " च्या पोटलीत !!!

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi PodcastBy Shilpa Inamdar Yadnyopavit

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

2 ratings