आता येथे अर्जुन स्वतःला ज्ञानी समजत आहे. तो श्रीकृष्णाला विचारतो की, विवेकी व बुद्धिमान असूनही आपण हे पाप का करावे? त्याच्या मते भगवान कृष्णही पाप करत आहे. ह्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो म्हणतो " मी हे युद्ध करू शकणार नाही " आणि धनुष्य-बाण खाली ठेवून रथाच्या मागे जाऊन खाली बसतो. क्षेत्र-क्षेत्रज्ञ संघर्षातून माघार घेतो.