काव्यकथा मराठी

बहिणाबाईंच्या कविता


Listen Later

बहिणाबाई चौधरी (जन्म : इ.स. १८८०; मृत्यू : ३ डिसेंबर, १९५१) ह्या पूर्व खानदेशात (आताच्या जळगांव जिल्ह्यातील) असोदा येथे जन्मलेल्या कवयित्री होत्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई 'लेवा गण बोली'त आपल्या कवीता करत व त्यांचे चिरंजीव सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.
त्यांच्या कविता मराठी साहित्यातील अनमोल साठा आहे.
सुगरणीचा खोपा
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला !
पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला !
सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर
तिले जाल्माचा संगती मिये गाण्य गम्प्या नर
खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा!!
तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ
तुला देले रे देवान दोन हात दहा बोटं ???
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर ही बहिणाबाईंची प्रसिद्ध कविता आहे. अनेक पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश होता. अभ्यासक्रमात या कवितेला विशिष्ठ महत्व होतं.
मन वढाय वढाय
उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर.
मन मोकाट मोकाट
त्याले ठायीं ठायीं वाटा,
जशा वार्‍यानं चालल्या
पान्यावर्‍हल्यारे लाटा.
मन लहरी लहरी
त्याले हातीं धरे कोन?
उंडारल उंडारलं
जसं वारा वाहादन.
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर,
आरे इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर !
मन पांखरू पांखरूं
त्याची काय सांगूं मात ?
आतां व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत.
मन चप्पय चप्पय
त्याले नहीं जरा धीर,
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर.
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं ?
त्यांत आभाया मायेना.
देवा, कसं देलं मन
आसं नहीं दुनियांत !
आसा कसा रे यवगी
काय तुझी करामत !
देवा, आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनीं तुले
आसं सपन पडलं !
अरे संसार संसार
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।
अरे संसार संसार, होटा कधी म्हनू नाही
राउळीच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नाही ।
अरे संसार संसार, नाही रडन कुढन
येड्या, गयांतला हार, म्हणू नकोरे लोढनं ।
अरे संसार संसार, खिरा येला वरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकि लागतो रे गोड ।
अरे संसार संसार, म्हनू नकोरे भिलावा,
त्याले गोड भिम फुल, मधी गोडंब्याचा ठेवा ।
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे,
अरे वरतून काटे, मधी चिकणे सागर गोटे ।
एक संसार संसार, दोन्ही जिवांचा इचार,
देतो सुखाले नकार, अन् दुखाले होकार ।
देखा संसार संसार, दोन्ही जिवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुखःचा बेपार ।
अरे संसार संसार, असा मोठा जादुगर
माझ्या जिवाचा मंतर, त्यच्यावरती मदार ।
असा संसार संसार, आधी देवाचा इसर
माझ्या दैवाचा जोजर्, मग जिवाचा आधार ।
माझी माय सरसोती
माझी माय सरसोती माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!
माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता --भागवत
पावात समावत आणि मातीमधी उगवत !!
आरे देवाचं दर्सन झालं झालं आपसुक
हिरीदात सुर्याबापा दाये अरूपाच रूप !!
तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानांमधी
देवा तुझ येनजान वारा सांगे कानामधी !!
फुलामधी समावला धरत्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय !!
किती रंगवशी रंग रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात !!
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

काव्यकथा मराठीBy Kavita Deoghare