रामकुटी | Ramkuti

भरजरी ग पीतांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण।। स्वर अनुजाताई वांगीकर


Listen Later

१९५३ मध्ये प्रदर्शित झालेल्या साने गुरुजींच्या 'शामची आई' या पुस्तकावरून याच नावाने निर्मिलेल्या चित्रपटाने समीक्षकांसह रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या गाण्यात आशा ताईंच्या सुरेल आवाजास वसंत देसाई यांनी करुण साज चढवले होते. 'भरजरी गं पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण..’ या गाण्यामध्ये श्रीकृष्ण आणि द्रौपदी या भावा-बहिणीच्या नात्याचं वर्णन केलं आहे
हे अवीट गोडीचं गाणं लिहिलं होतं आचार्य प्र.के.अत्रे यांनी !
भरजरी गं, पितांबर, दिला फाडुनद्रौपदीसी बंधु शोभे नारायणसुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिणविचाराया गेले नारद म्हणूनबोट श्रीहरिचे कापले ग बाईबांधायाला चिंधी लवकर देईसुभद्रा बोलली, “शालु नि पैठणीफाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?”पाठची बहिण झाली वैरिण !द्रौपदी बोलली, “हरिची मी कोण ?परी मला त्याने मानिली बहीणकळजाचि चिंधी काढून देईनएवढे तयाचे माझ्यावरी ऋणवसने देउन प्रभू राखी माझी लाजचिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !”त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडूनप्रेमाचे लक्षण भारी विलक्षणजैसि ज्याची भक्ती तैसा नारायणरक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेमपटलि पाहिजे अंतरीची खुणधन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीणप्रिती ती खरी जी जगी लाभाविणचिंधी पाहून हरी झाले प्रसन्न
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

रामकुटी | RamkutiBy Shrikant Borkar