एखाद्या गोष्टीची भीती वाटणे भय असणे हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. तो सगळ्यालाच लागलेला एक शाप आहे किंवा कधीकधी वरदानही म्हणू शकतो.
इथे प्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या रूपात भीतीला तोंड द्यावेच लागते.
जन्माला आल्यापासून तर पार मृत्यू पर्यंत कसल्या न कसल्या रूपात ‘भय’ पाठीवर बसलेलेच आहे, नी त्यापासून कोणीच चुकत नाही.