Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast

Career Choices - Confusion to Clarity !!


Listen Later

आजकाल करियरच्या दृष्टीने कल जाणून घेणं हे १० वी च्याही आधीच सुरु होतं आणि ते बऱ्याच अंशी गरजेचंही असतं पण अनेकदा पालक त्याविषयी गोंधळलेले दिसतात. सध्या १०वी - १२वी च्या परीक्षांचा काळ सुरू आहे… त्यानंतर इतर सगळ्याच इयत्तांच्या परीक्षा सुरु होतील. घरात अभ्यासाचं वातावरण, ताण, अपेक्षा आणि पुढे काय? माझ्या मुलाला नक्की काय करायचंय? त्याच्या दृष्टीने योग्य करियर कुठलं ? आपण चुकीचा निर्णय तर घेत नाही ना... असे प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात येतात…आणि ते अगदी स्वाभाविक आहेत!

आणि म्हणूनच या भागात आपण मारणार आहोत मनमोकळ्या गप्पा – करिअर निवडीच्या गोंधळावर !! आणि त्यासाठी आपल्याबरोबर असणार आहे; डॉ. अनुजा कुलकर्णी जी तिच्या Consultant Psychologist आणि Vocational Counsellor म्हणून असलेल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहे 😊
✨ मुलांची नैसर्गिक क्षमता कशी ओळखायची?
✨ Skills development आणि aptitude टेस्टिंग ७वी-८वी पासूनच सुरु केलं तर त्याचा कसा फायदा होऊ शकतो ?
✨ Psychometric assessments म्हणजे नक्की काय?
✨ आणि योग्य assessments मुळे करिअरचा मार्ग कसा स्पष्ट होतो?
Career guidance विषयी मनात गोंधळ असणाऱ्या प्रत्येक पालकाने आणि मुलाने बघावाच असा हा पॉडकास्ट आहे. हा episode पालकांसाठी एक मार्गदर्शक ठरू शकतो—ताण कमी करण्यासाठी, योग्य प्रश्न विचारण्यासाठी आणि मुलांसोबत बसून विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी आणि मुलांसाठीही; कारण हाच असतो स्वतःला ओळखण्याचा एक सुरुवातीचा टप्पा.

Self'less' Parenting म्हणजे – परीक्षे पलीकडचा विचार…आणि मुलांच्या भविष्याकडे शांत, समजूतदार पाऊल टाकणं !! आवर्जून पहा, विचार करा आणि इतर पालकांपर्यंत नक्की पोहोचवा

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi PodcastBy Shilpa Inamdar Yadnyopavit

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

2 ratings