Anandache Dohi

Deva Tujhe Prem Aamhasi Paave Pg no 148


Listen Later

By Dattaprasad Joshi

देवा तुझे प्रेम आम्हासी पावे ।

प्रिय आम्हा ते व्हावे ॥धृ.॥

 

भक्त तुझे आम्ही साधे ।

परि तू रमसी अमुच्यामधे ।

प्रेम तुझे तूचि द्यावे ॥1॥

 

आम्हा सखा तू म्हणतोसी ।

सख्यत्व परि तूचि देसी ।

प्रेम तुझे तूचि घ्यावे ॥2॥

 

कार्यरूपे तू पुढे धावसी ।

आम्हा संगे प्रेमे ठेवसी ।

भक्तिमार्गे तूचि न्यावे ॥3॥

 

आम्ही धन्य तुझ्या पायी ।

स्थान तू देसी आम्हा हृदयी ।

प्रेम तुझे जाणावे ॥4॥

 

देवाचे या प्रेम न्यारे ।

अपुल्या भक्ता देऊनी सारे ।

परमानंदी रमवावे ॥5॥

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Anandache DohiBy Saurabh Kapoor