Astra news network podcast

ए एन एन न्यूज नेटवर्क गुन्हेविषयक बातमीपत्र दिनांक ०८ जून २०२५


Listen Later

ए एन एन न्यूज नेटवर्क बातमीपत्र

दिनांक ०८ जून २०२५

नमस्कार! ए एन एन न्यूज नेटवर्क वरून प्रसारित होणाऱ्या गुन्हेविषयक बातमीपत्रामध्ये आपले स्वागत.

 

आजच्या ठळक बातम्या:

 

तीस लाख रुपयांचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त; ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई

कात्रज-कोंढवा रोडवर दोन तरुणांना सशस्त्र अवस्थेत अटक

चाकण परिसरात कौटुंबिक वादातून खून

जमिनीच्या वादावरून परस्परविरोधी गुन्हे दाखल

 

आता पाहूया सविस्तर बातम्या

ठाणे गुन्हे शाखेने गोव्यातून बेकायदेशीरपणे आणलेला तीस लाख रुपयांचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. डोंबिवली येथील या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी गोव्यातून कमी दर्जाच्या मद्याच्या बाटल्या आणून त्यांवर मूळ ब्रँडचे बनावट लेबल लावून विक्री करत होते. पोलिसांनी १८ हजार २९० बाटल्या, बनावट लेबल तयार करण्याचे साहित्य आणि वाहन जप्त केले आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे मोठे रॅकेट उघड झाले आहे.

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज-कोंढवा रोडवर दोन तरुणांना सशस्त्र अवस्थेत अटक केली आहे. शुभम माने आणि गणेश लंके या आरोपींकडून गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. कपिलामृत डेअरीजवळील मोकळ्या मैदानात हे आरोपी शस्त्र हाताळत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. या प्रकरणी हत्यार अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड नजिक चाकण परिसरात कौटुंबिक वादातून एक धक्कादायक हत्याकांड घडले आहे. दशरथ पानसरे याने लोखंडी गजाने भोसकून ६२ वर्षीय दत्तात्रय पानसरे यांचा खून केला आहे. फ़िर्यादीची पत्नी आणि आरोपीची आई यांच्यामधील वादातून हा प्रकार घडला. हत्येचा प्रयत्न टाळण्यासाठी मध्यस्थी करत असताना फ़िर्यादीच्या वृद्ध  वडिलांच्या छातीत आरोपीने लोखंडी सळी भोसकल्याने त्यांचा मृत्यू झाला. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

हिंजवडी पोलिसठाण्यात जमिनीच्या वादावरून एकाच दिवशी दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. वकील संदीप भोईर आणि शेतकरी शब्बीर मुलाणी यांच्यातील वादात एकीकडे मुलाणी यांनी भोईर यांनी आपणाला बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे मुलाणी यांनी न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याचा आरोप भोईर तक्रारीत केला यांनी  आहे. कासारसाई येथील सर्व्हे नंबर १९/१ मधील जमिनीच्या मालकीहक्काचा हा वाद आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे.

या होत्या आजच्या काही गुन्हेविषयक बातम्या. अधिक बातम्या आणि विश्लेषणासाठी पहात रहा  अस्त्र न्यूज नेटवर्क डॊट इन.

 Marathi News, Podcast Script, Maharashtra Crime, Police Action, Court News, Aakashwani Format

 #MarathiNews #Podcast #Maharashtra #CrimeNews #Police #Court #Aakashwani


...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Astra news network podcastBy ann