Astra news network podcast

ए एन एन न्यूज नेटवर्क गुन्हेविषयक बातमीपत्र दिनांक ०९ जून २०२५


Listen Later

ए एन एन न्यूज नेटवर्क बातमीपत्र

दिनांक ०९ जून २०२५

नमस्कार! ए एन एन न्यूज नेटवर्क वरून प्रसारित होणाऱ्या गुन्हेविषयक बातमीपत्रामध्ये आपले स्वागत.

आजच्या ठळक बातम्या:

खंडणी रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरी येथे तरुणांवर प्राणघातक हल्ला

५२ लाखांची सायबर फसवणूक

वाघोलीत ट्रकच्या धडकेने कारचालकाचा मृत्यू

शिवाजीनगर गावठाणात हाणामारी, चार अटकेत

माळवाडी मांजरी येथे मारामारी

नवी पेठेत जबरी चोरी

हडपसरमध्ये घरफोडी

वारजे माळवाडीत जेवणाच्या वादातून मारामारी

वाघोलीत लोखंडी शिड्यांची चोरी

लोहगावात सलूनमधून लाखोंची रोकड लंपास

आता पाहूया सविस्तर बातम्या

पुण्यातील गणेश पेठ मच्छी मार्केट परिसरातून खंडणी उकळणाऱ्या एका रॅकेटचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मासे विक्रेत्याकडून सन २०१६ पासून ४८ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या शिवम उदयकांत आंदेकर आणि आकाश सुरेश परदेशी यांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडमधील एच.ए. कंपनीजवळ जुन्या वादातून तरुणांवर कोयता आणि चाकूने वार करण्यात आले. अरमान अजीज सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वासीम शब्बीर सय्यद, जावेद शब्बीर सय्यद, रोहित कसबे, फरमान सैफी आणि लाला पठाण या आरोपींनी हा हल्ला केला. या प्रकरणी जावेद शब्बीर सय्यद आणि फरमान सैफी यांना अटक करण्यात आली आहे

पिंपरी चिंचवडमध्ये सायबर चोरट्यांनी 'मुंबई क्राईम ब्रांच' आणि 'फायनान्स डिपार्टमेंट'चे अधिकारी असल्याची बतावणी करत एका व्यक्तीची ५२ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. संताजी घोरपडे आणि जॉर्ज मॅथ्यू अशी आरोपींची नावे सांगण्यात आली आहेत. या प्रकरणी सायबर पोलीस निरीक्षक नाळे अधिक तपास करत आहेत.

पुण्यातील वाघोली येथील गाडे वस्ती चौकात भरधाव ट्रकच्या धडकेने कारचालक युवराज चंद्रकांत पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत युवराजचे भाऊ अनिरुद्ध पाटील यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, फरार ट्रकचालकाचा शोध सुरू आहे.

शिवाजीनगर गावठाणात जुन्या वादातून झालेल्या हाणामारीप्रकरणी आदित्य उर्फ बार्कया राजेश वडसकर, अर्थव अजय कदम, रोहन संतोष शिंदे आणि प्रथम नितीन मोहिते या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर चार संशयित अद्याप फरार आहेत.

माळवाडी मांजरी बुद्रुक येथे जुन्या भांडणातून झालेल्या मारामारीत पाच अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हसन मुलानी अधिक तपास करत आहेत.

पुण्यातील नवी पेठेत एका पादचाऱ्याकडून १० हजार रुपये रोख आणि मोबाईल फोन जबरदस्तीने लंपास करण्यात आला. या प्रकरणी प्रणव विजय परदेशी (१९) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष मोरे तपास करत आहेत.

हडपसर येथील गोळेनगर स्वामी समर्थ मंदिराजवळ एका बंद घरातून चोरट्यांनी २ लाख ४५ हजार रुपयांचे रोख आणि दागिने लंपास केले आहेत. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हडपसर पोलीस तपास करत आहेत.

वारजे माळवाडीतील म्हाडा कॉलनीत मावशीकडील जेवणाच्या वादातून झालेल्या मारामारीत बापू उर्फ सोन्या बबन पवार आणि संतोष उर्फ गुड्डू जहांगीर काळे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वाघोलीतील जय बाबा वेअर हाऊसमधून तीन अज्ञात चोरट्यांनी २ लाख रुपयांच्या १७२ लोखंडी शिड्यांची चोरी केली आहे. लोणीकंद पोलीस तपास करत आहेत.

लोहगावातील लक्झरी स्टार युनिसेक्स सलूनमधून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.

या होत्या आजच्या काही गुन्हेविषयक बातम्या. अधिक बातम्या आणि विश्लेषणासाठी पहात रहा  अस्त्र न्यूज नेटवर्क डॊट इन.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Astra news network podcastBy ann