Histroy not mystery! इतिहास आहे रहस्य नाही च्या आजच्या या तिसऱ्या भागात मी यश तुमचं स्वागत करतो.मंडळी आपण पानिपत ऐकलं,भीमा कोरेगाव ऐकलं दोन्ही घटना खरोखर हळहळ वाटाव्यात अश्या होत्या मात्र आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अश्या घटनेबद्दल बोलणार आहोत की जी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात एक मानबिंदू म्हणून आहे,ती घटना प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस आहे ती घटना, तो दिवस म्हणजे राज्याभिषेक दिन..!