"घ्या नि खा देह माझा" - मराठी चर्च मंत्र.3gp //1 करिंथ 15मृतांचे पुनरुत्थान1. बंधुजनहो, जे शुभवर्तमान मी तुम्हांला घोषित केले, ज्याचा तुम्ही स्वीकार केला, ज्याच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, 2. ज्याच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, त्याच शुभवर्तमानाची मी तुम्हांला आठवण करून देतो. जो संदेश मी तुम्हांला घोषित केला, तो संदेश तुम्ही दृढ धरला असेल. नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.3. मला जे मिळाले, ते मी अत्यंत महत्त्वाचे समजून तुमच्या सुपूर्त केले, म्हणजेच पवित्र शास्त्रानुसार ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांसाठी मरण पावला. 4. तो पुरला गेला आणि धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. 5. तो प्रथम पेत्राला व नंतर बारा जणांना दिसला. 6. त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यांतील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, परंतु काही निधन पावले आहेत. 7. त्यानंतर तो याकोबला व पुढे सर्व प्रेषितांना दिसला8. आणि जणू काही अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. 9. कारण प्रेषितांत मी सर्वांत कनिष्ठ आहे. प्रेषित म्हणवून घेण्यास मी पात्र नाही; कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला. 10. तरी जो काही मी आहे, तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे, ती व्यर्थ झाली नाही. उलट त्या सर्वांपेक्षा मी अधिक श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. 11. सारांश, मी असो किंवा ते असोत आम्ही अशीच घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला आहे.