==="सभी लोगों के लिए अच्छी खबर" -(हिंदी,বাঙালি,తెలుగు,मराठी,தமிழ்,اردو,ગુજરાતી,ಕನ್ನಡ,മലയാളം,ଓଡ଼ିଆ,ਪੰਜਾਬੀ,Ôxômiya,etc.)-संख्या से सर्वाधिक बोली जाने वाली भाषाओं (१-१२) भारत में // (Hindi,,Bengali,Telugu,Marathi,Tamil,Urdu,Gujarati,Kannada,Malayalam,O

Episode 1: Marathi - "Words of Life No.2".3gp


Listen Later

"शब्द च्या जीव क्रमांक 2" - मराठी.3gp //1 करिंथ 13प्रीती ही अधिक महान1. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषा जरी बोलू शकलो आणि माझ्यामध्ये प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. 2. संदेश देण्याचे कृपादान जरी मला लाभलेले असले, सर्व रहस्ये व सर्व विद्या मला अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका माझा विश्वास दृढ असला आणि माझ्या मध्ये प्रीती नसली, तर मी शून्य आहे. 3. मी माझे सर्व धन जरी अन्नदानार्थ दिले व माझे शरीर जाळण्यासाठी दिले आणि माझ्यामध्ये प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.4. प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही, फुशारकी मारत नाही, गर्वाने फुगत नाही, 5. ती सभ्यता सोडून वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; 6. ती दुष्कृत्यात आनंद मानत नाही, तर सत्यात आनंद मानते. 7. प्रीती सर्व गोष्टींत चिकाटी सोडत नाही आणि सर्व गोष्टींवर श्रद्धा ठेवते, सर्व गोष्टींत आशा बाळगते व सर्व गोष्टींत धीर कायम ठेवते.8. प्रीती शाश्वत स्वरूपाची आहे. परंतु संदेश असले, तरी ते कालबाह्य होतील. अपरिचित भाषांची कृपादाने असली, तरी त्यांना अंत आहे आणि विद्या असली, तरी ती संपुष्टात येईल; 9. कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि आपल्याला अंशतः संदेश देता येतो. 10. पण जे परिपूर्ण ते आल्यावर, अपूर्ण ते नष्ट होईल.11. मी मूल होतो, तेव्हा माझे बोलणे, माझ्या भावना व माझे विचार मुलासारखे असायचे. आता प्रौढ झाल्यावर मी बालिशपणा सोडून दिला आहे. 12. ह्री आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते, ते अपूर्ण आहे. पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन.13. सारांश, विश्वास, आशा व प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यांत प्रीती अधिक महान आहे.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

==="सभी लोगों के लिए अच्छी खबर" -(हिंदी,বাঙালি,తెలుగు,मराठी,தமிழ்,اردو,ગુજરાતી,ಕನ್ನಡ,മലയാളം,ଓଡ଼ିଆ,ਪੰਜਾਬੀ,Ôxômiya,etc.)-संख्या से सर्वाधिक बोली जाने वाली भाषाओं (१-१२) भारत में // (Hindi,,Bengali,Telugu,Marathi,Tamil,Urdu,Gujarati,Kannada,Malayalam,OBy Tze-John Liu