Sign up to save your podcasts
Or

Guru Shishya Sukhanandsamwad as on 19th May 2026
सुप्रभात, 'आमचा स्वहिताचा धंदा' असे तुकाराम महाराजांनी म्हटलयं. प्रभूंनी बहुजनहिताय बहुजनसुखाय कार्याचा अव्यापारेषु नव्हे तर व्यापारेषु व्यापार सुरू केला . आणि आता कार्याला वळण देऊन ते स्वानंदाच्या धंद्यात रममाण झाले आहेत. तसे बघायला गेले तर बाह्यांगाने कार्य करत असतानाही ते स्वानंदात रमले होतेच. पण आता ते केवळ स्वानंदातच नाहीत तर सच्चिदानंद रूपात रमलेले आहेत. विलोभनीय रूप. जय परमानंद 🙏🙏🙏
सुप्रभात, जेणे निरासे संसार भ्रांति अशी सद्बुद्धी मला दे अशी मागणी आहे. आर्ततेने केलेल्या प्रार्थनेतून दत्तप्रभू सद्बुद्धी देतातही. पण इथे प्रभू सावध करतात. संसाराची भ्रांति गेली म्हणजेच भक्ती घडली असे वाटायला लागते. भ्रांति जाते पण भक्तिविषयी संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम जाण्याकरता केवळ सद्बुद्धी नाही तर सदसद्विवेक बुध्दी प्राप्त करून घ्यायला हवी. अशी सदसद्विवेक बुध्दी प्रभूंच्या कृपेनेच प्राप्त होईल. तसा ध्यास मात्र लागायला हवा. जय परमानंद 🙏🙏🙏
सुप्रभात, पुराणात सप्तचिरंजीवांचा उल्लेख आहे. अश्वत्थामापासून कृपाचार्यांपर्यंत. पण खरे अमरत्व भक्तीलाच आहे आणि या अमरत्वात आनंद आहे. दु:खाचा लवलेश नाही . 'चिरंजीव झाले जगी दास दोन्ही' असे श्रीअवधूतप्रभू म्हणतात आणि प्रभू हे तत्व स्वतःच्या चरित्राने सिध्द करतात. म्हणून भक्त हनुमंत व भजनीय व भक्तव्य दत्तप्रभू दोघेही अजरामर आहेत .देव व भक्त हे नाते अमर आहे. जय परमानंद 🙏🙏🙏
By Saurabh KapoorGuru Shishya Sukhanandsamwad as on 19th May 2026