Jyoti Sakpal

Fathers day


Listen Later

चाहूल  लागताच  नव्या  पाहुण्याची तो आनंदाने  नाचतो 
रोज नवीन नवीन स्वप्नांची सांगड  घालत असतो
मुलगा झाला तर अस करेन, मुलगी  झाली तर तसं करेन म्हणतं असतो.
ते  नऊ  महिने  त्याच्या  स्वप्नात   त्याचा  चेहरा तो बनवत  असतो
आतुरता  त्याला हि आई  एवढीच  असते
डोळ्यात  पाणी  त्याच्याही दाटून येत  असते
स्पर्श होता त्याचा  तो सर्व दुःख  विसरतो 
जगण्यासाठी त्याला आता नवा मार्ग  मिळतो.
आई  ऐवढीच  त्यालाही काळजी खूप असते
बाप  म्हणून  जबाबदारीची  जाणीवहि असते 
वेळ  देता येत  नाही म्हणून  चीड चीड त्याची होते 
भविष्याची त्याच्या तरतूद  त्याची  चालू  असते
अस्तित्व  त्याचहि  आई  एवढेच  असते
बाप  म्हणून  मिरवताना  त्याला खूप आवडते 
कठोर  शद्बातहि त्याच्या माया खूप असते. 
कधी   बाप तर कधी  मित्र  म्हणून त्याची  ओळख असते .
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Jyoti SakpalBy Jyoti Sakpal