गैरसमजातून बरीच नाती तुटतात. आपल्या जवळच्यांना सांगा.
'गैरसमज'
गैरसमज नखाएवढा,
होतो नको एवढा.
मनामध्ये शंकेचा कल्लोळ अन विचारांचा काहूर,
काळजा जवळच्या जिवाभावाला, क्षणातचं करतो दूर.
संपवून टाकतो विश्वास, जपलेला जो आयुष्यभर,
विचारही करत नाही कि तो का जपला मग आजवर.
का हा समज नाही, कि हा गैरसमज गैर आहे.
अन त्याचं होणं, हे समजुतीचंच एक वैर आहे.
ना कोणते प्रमाण आहे, ना ही याला काही बूड आहे,
आपुल्या आपुलकीला, अगतिकतेचा हा तर सूड आहे.
काळजाचा घाव, असा कसा सोसावा,
म्हणूनच तर तुझ्यामाझ्यात, हा कधीच नसावा.