Sign up to save your podcasts
Or
By Praveen Aathavle
गुरुवरा वरदान हे प्रेमे मज द्यावे ।
हृदयी माझ्या नित्य राहूनी पदी मजसी ठेवावे ।।धृ.॥
हृदयमंदिरी तुझी प्रेममूर्ति । नित्य जागवी तुझीच प्रीती ।
त्या प्रेमाचा अनुभव घेण्या पदी तुझ्या यावे ॥ 1 ॥
प्रेमरूप तू प्रेम माझेवरी । प्रेम माझे तव रूपावरी ।
प्रेमावरती प्रेम जाऊनी प्रेमी त्या बुडावे ॥ 2 ॥
अनुभव तुझा तू प्रगटविसी । अज्ञानासी पूर्ण हटविसी ।
ज्ञानप्रकाशी तव हृदयीच्या प्रेमासी पहावे ॥ 3 ॥
स्वरूप तूझे आनंदघन । लाविसी मज ते अनुसंधान ।
सर्व वृत्ती सर्व भाव तव भजनी लागावे ॥ 4 ॥
भक्तहृदयी श्रीगुरुमूर्ति । गुरुपदी प्रेमे जडली भक्ती ।
परमानंदावरती प्रेम नित्यचि वाढावे ॥ 5 ॥