विजय बोराटे म्हणजे अमिताभ बच्चन हे क्रिडा-शिक्षक असतात. त्यांना खेळा सोबतच समाज कार्याची पण आवड असते. ते दिवसभरात काही ना काही समाज कार्य करतचं. ते एका झोपडपट्टी मध्ये रोज जात तिथल्या लोकांचे निरीक्षण करत. एकदा त्यांनी बघितलं की झोपडपट्टी मधली मुले डब्बा घेऊन फुटबॉल खेळत होते आणि तिथून त्यांच्या मनात नव्या कल्पनेचा उदय होतो. मग ते कशी टीम तयार करतात आणि पुढे काय होतं? हे सगळं जाणून घेण्यासाठी हे समीक्षण नक्की ऐका.