Sign up to save your podcasts
Or
काव्यातले काही is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!
This episode features a popular song from the film "SaraswatiChandra". Listen to the podcast to know which one it is!
Marathi Poem
चंदनाची काया तुझी अन चपळ नेत्र पल्लवी
हळूच लकेर ओठावर स्मिताची उमटावी
अशा गोड हरकतींना उपमा न काही सुचावी
वागलो जर वेड्या सारखा, माफी थोडी असावी
कमनीय कमानीसम या भुवया
पापण्यांचे काजळ वेचावया
तुझ्या ओजस्वी भाळी जावया
तुझे खरवसाचे ओठ उलगडाया
दुष्काळ मनाचा माझ्या संपवाया
सावली मध्यानी तुझी पडावया माझ्यावर राजी असावी
यासाठी जर केली मी गयावया, माफी थोडी असावी
अंग सुंदर रंग सुंदर
दंग मनाचे चंग सुंदर
तू धुरंधर प्रेम कलंदर
ओळखून भाव सादर ओळखीचे तू हसावी
धरला प्रेमाने मी पदर तर माफी थोडी असावी
अन थोडी लाजलाली गाली तुझ्या पसरावी
चंदनाची काया फुलावी नेत्रपल्लवी उजळावी
Concept and Execution by Unmesh Joshi
Story reference https://www.youtube.com/watch?v=dQMVAxYEZcI