काव्यातले काही (KavyaTale) | A Marathi Podcast for poems

काव्यातले काही (KavyaTale) | Episode 5 | कुठेतरी दूर (Kuthetari Door) | Marathi Podcast


Listen Later

काव्यातले काही (KavyaTale) is a Marathi podcast about appreciating (old) Hindi songs and interpreting them in Marathi!


This episode features a popular song from the 1971 film "Anand". Listen to the podcast to know which one it is!


Marathi Poem


कुठेतरी दूर सविता कलते

सांज वधूसम संयमी फलते

हळूच पसरते

माझ्या विचारांच्या अंगणी

कुणी स्वप्नाचे दिवे प्रज्वलते

कुठेतरी दूर सविता कलते


कधी तरी जड होई उगाचच श्वास

भरून माझे डोळे येती तासनतास

तशात होई मला कसलासा भास

थाप मारून कुणी होई चालते

कुठेतरी दूर सविता कलते


कधीकधी मन वेडे भुरळत नाही

कधी मिळे नाते दिशा हुरळत दाही

गोड गडबड होई वैरी मनात काही

मनासारखे झाले म्हणून मला सलते

कुठेतरी दूर सविता कलते


मनाला ठाव आहेत विचार माझे गहिरे

स्वप्नच होती माणके माणसे माझे गं हिरे

दर पेशीत माझ्या रंगीत स्वप्न उरे

नसानसांत या कविता डोलते

कुठेतरी दूर सविता कलते

सांज वधूसम संयमी फलते

हळूच पसरते


Background score by : https://www.youtube.com/watch?v=Z0QE3QyEVaU

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

काव्यातले काही (KavyaTale) | A Marathi Podcast for poemsBy unmeshjoshi