नमस्कार मंडळी, कसे आहात?
आपल्या मराठी माणसाची हक्काची आणि विश्वासाची वधुवर सूचक वेबसाईट 'जमलं हो जमलं' आपल्या सेवेत रुजू झालेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 'जमलं हो जमलं' वर रजिस्टर का करायचं?
मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो, ज्यावरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
'जमलं हो जमलं' वर का रजिस्टर करायचं?
वधुवर संशोधन करताना आपण अनेक वधुवर मेळाव्यांमध्ये नाव नोंदणी करतो. एका मेळाव्यात नावनोंदणी करण्यासाठी साधारणपणे २५० रुपये खर्च तरी येतोच. शिवाय मेळाव्याच्या ठिकाणी जाणे येण्याचा खर्च होतोच. एकंदरीत एका मेळाव्यासाठी ५०० रुपये सहज खर्च होऊन जातात. शिवाय तो पूर्ण दिवस जातो. असे आपण वर्षातून किमान २ ते ३ मेळावे तरी करतो. म्हणजेच वधुवर संशोधनासाठी आपण एका वर्षात कमीत कमी १००० रुपये सहज खर्च करतो. त्याचसोबत आपला वेळ सुद्धा खर्च करतो. नावनोंदणी केल्यानंतर महिन्याभराने आपल्याला पुस्तक मिळते मग आपण स्थळे पाहतो. ते सुद्धा मर्यादितच.
'जमलं हो जमलं' वर आपण अमर्याद स्थळे बघू शकतो, त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर अवघ्या २४ तासात आपली प्रोफाइल आधार कार्ड वरून पडताळली जाते आणि आपण स्थळं बघायला सुरवात करू शकतो, संपर्क करायला सुरु करू शकतो. आणि 'जमलं हो जमलं' ही सेवा फक्त ८२८ रुपयांत देते ते सुद्धा संपूर्ण १ वर्षासाठी. म्हणजेच आपण १ वर्षात घरात बसल्या बसल्या आपल्या मोबाईल वरून अमर्याद स्थळांची माहिती घेऊ शकतो, त्यांना संपर्क करू शकतो ते ही फक्त ८२८ रुपयांत.
बाकीच्या वेबसाईट सोडून 'जमलं हो जमलं' वर का रजिस्टर करायचे?
1. 'जमलं हो जमलं' वर प्रत्येक प्रोफाइल ही आधार कार्ड पडताळून सक्रिय केली जाते. रजिस्टर करताना आधार कार्ड बंधनकारक आहे. त्यामुळे 'जमलं हो जमलं' वर खोट्या प्रोफाइल अजिबात नाहीत. ज्यांना खरंच लग्न करायचं आहे त्यांची खरी प्रोफाइल 'जमलं हो जमलं' वर पाहायला मिळते.
2. हजारोंचे पॅकेज देऊन ग्राहकांना लुबाडले 'जमलं हो जमलं' ला मान्य नाही. 'जमलं हो जमलं' हा मराठी तरुणांनी मराठी लोकांसाठी बनवलेला प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे इथे आपल्या लोकांचा फायदा कसा होईल याचा प्रामुख्याने विचार केला गेला आहे. आर्थिक दृष्ट्या प्रत्येकाला परवडेल आणि प्रत्येकाचे समाधान होईल अशा प्रकारे 'जमलं हो जमलं' ने आपली फी १ वर्षासाठी फक्त ८२८ रुपये ठेवली आहे. म्हणजेच जिथे इतर ठिकाणी काही महिन्यांसाठी हजारो रुपये घेतात तिथे 'जमलं हो जमलं' १ वर्षासाठी फक्त ८२८ रुपये घेते (दिवसाला फक्त २ रुपये २६ पैसे). आणि यात आपण असंख्य स्थळे बघू शकतो. जे स्थळं पसंत पडेल त्याच्याशी थेट संपर्क साधू शकतो.
3. 'जमलं हो जमलं' ची वार्षिक फी ८२८ रुपये आहे. ही फी जर जास्त वाटत असेल आणि अजून १०% सूट हवी असेल तर तशी सोय सुद्धा उपलब्ध आहे. आपण 'जमलं हो जमलं' ला आपल्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत व्हाट्सअँप वर शेयर केलं तर आपल्याला अजून १०% सूट मिळते आणि आपण फक्त ७४५ रुपयांत १ वर्षासाठी अमर्याद स्थळं पाहू शकतो.
www.jamalhojamal.com