Menaka Classics

Menaka Classics - Trailer Episode


Listen Later

Menaka Classics - Nostalgia unlimited! Official Marathi Podcast of Pune-based Menaka Prakashan, having a literary legacy of six decades. काही गोष्टी कायमच तरूण असतात...बाळबोध मराठी साहित्यात बंडाचे अंगार फुलायला नुकतीच सुरवात झाली होती. त्या म्हणजे साठच्या दशकात मराठीत शृंगार आणि साहस असं ब्रीद घेऊन ‘मेनका’चा जन्म झाला. महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजीची तर त्याच्या बरोबर तीन महिने आधी म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० या दिवशी मेनकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.‘मेनका’ या नावाबरोबरच येणारं मुसमुसतं तारूण्य या अंकात होतं. मराठी कादंबरी वयात यायला सुरवात झालेला हा काळ होता. त्यामुळे फुलू पाहणाऱ्या मराठी माणसाच्या शृंगाराला ‘मेनका’मुळे नवा गंध लाभला. मराठीतील नामवंत लेखकांबरोबरच लिहिण्यासाठी अधीर असणाऱ्या तरूण अनोळखी लेखकांनी ‘मेनका’ला जवळ केलं, त्यांचा शृंगार ‘मेनका’च्या पानापानातून टपटपू लागला. 

काळाच्या ओघात ‘माहेर’ नावाचं महिलांचे विषय कवेत घेणारं मराठीतील एका दर्जेदार मासिकानं जन्म घेतला. ‘मेनका’ची ही भगिनी महाराष्ट्रातील घराघरांत राज्य गाजवू लागली. त्यानंतर ‘जत्रा’ सुरू झालं. मराठीतील इब्लिस, चहाटळ विनोदाचा रंग बेभानपणानं रंगवणारा ‘जत्रा’ महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनला. ‘मेनका’, ‘माहेर’ आणि ‘जत्रा’ या एकाच कुटुंबातील तीनही भावंडांचे स्वभाव मात्र भिन्न राहिले. पण प्रत्येकानं आपापल्या वाचकांच्या मनात घर केलं. महाराष्ट्रासह देशातील नामवंत लेखक ‘मेनका’, ‘माहेर’ व ‘जत्रा’मध्ये लिहीणे भूषणावह मानू लागले. याच्यातून झाले काय की, हजारो मराठी कथांनी या तीनही मासिकांत आपला पहिला श्वास घेतला.

‘मेनका’ अजूनही चिरतरूणच आहे, हे ठामपणानं म्हणता येतं. अनेकांच्या लेखणीतून हजारो कथांनी ‘मेनका’ कायम बहरली. २०२२ मध्ये ‘मेनका’ला बासष्ट वर्षे पूर्ण होत असताना आणखी एकदा तरूण होण्याची संधी आलीय, ती मेनका क्लासिक्स या पॉडकास्टच्या निमित्तानं. मेनकाच्या जन्मापासून ते अगदी आताआतापर्यंत माहेर, मेनका आणि जत्रामध्ये प्रकाशित झालेल्या निवडक उत्तम कथा, लेख, किस्से, मुलाखती आणि बरंच काही या पॉडकास्टवर ऑडिओ रूपात असणार आहे. तेव्हा श्रोतेहो सज्ज व्हा एका अनोख्या नॉस्टॅल्जियासाठी, गतकाळात रमून जाण्यासाठी. ऐकत रहा मेनका क्लासिक्स!

Team Menaka Classics 

Concept and Channel Head – Niranjan Medhekar

Production Head – Amit Tekale

Producer - Abhay Kulkarni

Voice-over Artist of the Trailer – Tejashri Fulsounder

Editing and Postproduction – Nachiket Kshire

Curator and Project Coordinator – Mohini Wageshwari-Medhekar

Cover Design – Kiran Velhankar

Branding and Promotion – Sameer Khaladkar

Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India

For more details – [email protected]

Disclaimer

मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.  एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती.  कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही.

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Menaka ClassicsBy Menaka Prakashan