मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

मेतकूट, परागच्या मते


Listen Later

गेले काही महीने मी आणि माझे दोन मित्र- सागर आणि रोहीत - आम्ही एक प्रयोग करून बघितला.दर शनिवारी एका ठरावीक वेळी एकत्र येऊन ऑनलाईन गप्पा  मारल्या. 

विषय कोणते? तर  एखादे चांगले पुस्तक,  बघितलेला सिनेमा/डॉक्युमेंटरी किंवा आवडीचा वाटेल, समजावुन घ्यावा वाटेल असा एखादा विषय.  


खरं तर  यात बोलताना जेवढी मजा  आली त्यापेक्षाही खूप जास्त मजा ऐकण्यात आली. अनेक नवीन पुस्तके, नवीन विषय, काही interesting लोकं यांचे references मिळाले आणि एका  विषयाकडे किती वेगवेगळ्या  दृष्टिकोणातून पाहता येते याचीही  जाणीव झाली.


विषयांची, विचारांची, माहितीची अणि दृष्टीकोणांची ही  साधी, सोपी सरमिसळ म्हणजे हे जमलेले मेतकूट!

बघा तुम्हालाही हे सकस आणि पौष्टिक वाटतय का?


पण प्रतिक्रिया मात्र जरूर कळवत राहा म्हणजे हा प्रयोगात आम्हाला अजून सुधारणा करता येतील. प्रतिक्रिया थेट मला सांगू शकता, किंवा [email protected] इथे कळवू शकता.

तेव्हा आता दर आठवड्यात भेटत राहूच.

पराग

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)By Vatvatkaar