Motivational

मकर संक्रांत


Listen Later

संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे. कर्मयोगी सूर्य स्वतःच्या क्षणिक प्रभावाला झटकून अंधकारावर आक्रमण करण्याचा या दिवशी द्रढ संकल्प करतो. या दिवसापासून अंधार हळूहळू कमी कमी होत जातो.
मकर संक्रांत म्हणजे प्रकाशाचा अंधकारावर विजय. संक्रांति म्हणजे सम्यक क्रांती. संक्रांतिमध्ये सम्यक परिस्थिती स्थापन करण्याची अभिलाषा असते.
संक्रांति म्हणजे संगक्रांति. माणसाने या दिवशी संगयुक्त होण्याचा संकल्प करायला हवा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी विकारांच्या परिणामापासून मुक्त राहण्याचा प्रयत्न करायला हवा.
संक्रांति म्हणजे संघ क्रांती. कोणत्याही महान कार्याला संघटनेची गरज असते. संघामध्ये विशिष्ट प्रकारच्या शक्ती विपुल प्रमाणात एकत्रित होतात व त्या कोणतेही कठीण कार्य सहज शक्य बनवतात. चला सर्वजण संघटित होऊया.
योगसाधना करू या. समाज सशक्त बनवू या.
या उत्सवानिमित्त स्नेहाकडे जायचे असते. तिळगुळ द्यायचा असतो. जुने मतभेद गाढून टाकायचे असतात. भांडणे विसरायची असतात. स्नेहाची पुन्हा प्रतिष्ठापना करायची असते. आणि आपल्या कल्याणासाठी आपल्या जीवनात त्याचे गौरवाने भरलेले स्थान टिकवून ठेवायचे असते.
तिळा मध्ये असलेले तेल पुष्टीप्रद आहे. निसर्ग ऋतूनुसार फळ व वनस्पती देतो. ज्या ऋतूत ज्या प्रकारचे रोग होण्याची संभावना असते किंवा ज्याची गरज असते त्या ऋतूत त्या रोगानुसार औषधी वनस्पती, फळे वगैरे निसर्ग निर्माण करतो. हिवाळ्यातील कडक थंडीत शरीराचा प्रत्येक अवयव अखडून गेलेला असतो. रक्ताभिसरण मंद होण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो आणि शरीर रुक्ष झालेले असते. अशावेळी त्याला स्निग्धतेची गरज असते. तिळात या स्निग्धतेचा गुण आहे.
या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे. त्याच्या पाठीमागेही विशिष्ट अर्थ आहे. याने थंडीतही सूर्यस्नान घडते. आकाशात लाल, पिवळे, हिरवे वगैरे रंगाचे पतंग उडताना दिसतात. पतंगाची हस्ती व मस्ती तोपर्यंत राहते जोपर्यंत त्याची दोरी सूत्रधाराच्या हातात असते. मानव रूपी पतंगाचा सूत्रधार भगवंत । त्याचा विश्वास असल्यास मानवरूपी पतंग उडू शकतो.
या सणाच्या निमित्ताने सूर्याचा प्रकाश, तिळाचा स्नेह, गुळाचा गोडवा व पतंगाचा त्याच्या सूत्रधारावरचा विश्वास आपल्या जीवनात साकार झाला तरच आपल्या जीवनात योग्य संक्रमण झाले असे म्हणूया व आपले आरोग्य टिकवू या.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

MotivationalBy Mobile related Mahajan