पालवांचे ठसे

निस्वार्थी मित्र 🎶✒️


Listen Later

माझे निस्वार्थी मित्र जे मला सदैव साथ देतात.
माझ्या प्रत्येक सुख दुःखात सदैव माझ्या सोबत असतात,
मला अभिमान आणि गर्व वाटणारा माझा विजय तेच साजरा करतात,
माझ्या अयशस्वी संघर्षात मनाला झालेल्या असह्य जखमा तेच भरतात,
मनामधील कल्लोळ शांत करतात आणि एकटेपणाच्या शांततेत कल्लोळ करतात,
मला मंत्रमुग्ध करतात आणि ओढ लावतात, आई सारखे प्रेमळ आहेत, बाबांसारखे आधार देतात, ताईसारखे प्रोत्साहित करतात, मित्रांसारखे सोबत देतात आणि माझ्या स्वप्नातल्या परी इतके सुंदर आहेत.
धावपळीच्या जगात त्यांच्या कवेतच मी काही क्षण विसावतो.
जिज्ञासेने मग मी स्वतःलाही विसरतो. त्यांच्यासारखे असावे सर्वांनी असेच वाटते.
ना अपेक्षा, ना उपेक्षा, ना स्पर्धा, ना कुछ कम ना कुछ ज्यादा....
वंदन करतो त्या निर्मात्याला ज्यांनी त्यांना निर्माण केले.
त्यांनीच आईची आठवण होते, त्यांनीच प्रेमाची साठवण होते.
माझं प्रेम, माझं स्वप्न, माझं हसणं, माझं रडणं, माझं रुसणं, माझ्या भावना, माझ्या यातना, माझ्या कल्पना ...... तेच व्यक्त करतात. असे माझे मित्र 'शब्द'. जेव्हा मी असतो स्तब्ध तेव्हा बोलतात ते फक्त शब्द. धन्यवाद 🙏
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

पालवांचे ठसेBy sachin dhere