Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast

पालकपणाची जाणीव विस्तारणारं… पालकनीती !!! - with Dr. Sanjeevani Kulkarni [Founder- Palakneeti]


Listen Later

एकाच विषयावर वेगवेगळ्या माध्यमातून पण समांतर काम करत असलेल्या.. so called 'like minded' असणाऱ्या व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा ज्या गप्पा खुलतात आणि रंगतात त्या खूपच वेगळ्या आणि समृध्द करणाऱ्या असतात. ज्या हेतूने मी काम सुरु केलं तशाच किंबहूना त्याहीपेक्षा व्यापक हेतूने जवळपास ३५ वर्षांपूर्वी काम सुरु केलेल्या संजूताई अर्थात डॉ. संजीवनी कुलकर्णीना प्रत्यक्ष भेटल्यावर जे गवसलं ते कदाचित शब्दांत मांडता येणं कठीण आहे. १९८७मध्ये त्यांनी पालकनीती हे पालकत्वाला वाहिलेले मासिक सुरू केलं आणि १९९६ मध्ये पालकनीती परिवार ही विश्वस्त संस्था स्थापन झाली.

"पालकत्व"  या विषयावर संजूताई आणि पालकनीती परिवाराने जे काम करून ठेवलंय आणि अजूनही चालू आहे त्याला खरोखरीच सलाम आहे !!! मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, आज मी त्यांच्याशी जोडली गेले आणि तेही माझ्या कामामुळे. त्यांनी केलेलं कौतुक माझ्यासाठी त्यांच्या नावाप्रमाणेच 'संजीवनी' देणारं आहे !!! आणि त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास मला माझ्या पॉडकास्टच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोचवण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे !!! सादर आहे , पालकनीतीचा अभूतपूर्व प्रवास उलगडणारा नव्या सिझनचा नवाकोरा एपिसोड ; संजू ताईंबरोबरच !!! 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi PodcastBy Shilpa Inamdar Yadnyopavit

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

2 ratings