Sign up to save your podcasts
Or
#Marathikatha #marathistory #marathipodcast #podcast #durgedurghatbhari #navratri #dandiya #garbha #durgapooja
दुर्गे दुर्घट भारी
रात्री उशिरापर्यंत समीक्षा जागी होती. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती लॅपटॉपमधील जुने फोटो पाहत होती आणि जणू आपल्या भूतकाळातच हरवून गेली होती. भूतकाळ हा असा असतो ज्याच्या चांगल्या आठवणी माणसाला सदैव मोरपंखांच्या गुदगुल्या देऊन जातात तर वाईट आठवणी मोराच्याच पायांच्या नखांचे खोल ओरखडे देऊन जातात.ज्यांच्या जखमा तर भरून येतील; पण आठवणी कायमच वेदना देत राहतील.
लॅपटॉप झाकून ठेवून ती झोपण्यासाठी आडवी झाली खरी; पण काही केल्या तिला झोपच येईना. ती आपली कूस सतत बदलत राहिली पण आईची ती वाक्ये तिच्या मनःचक्षूवरती सतत पिंगा घालत होती- ‘नवरात्रीच्या तोंडावर साक्षात महिषासुरमर्दिनीच प्रकटली की काय पुढ्यात- तर लोक माझ्या लेकीला दुर्गेचा अवतार म्हणतील.’
रात्रीच्या त्या विचाराने तिची पार झोप खराब करून टाकली होती. सकाळी उठल्यावर तिचे डोके अगदी जड झाले होते. अजूनही तिच्या कानांत एकदम हळू आवाजात तिला ती वाक्ये ऐकु येतच असल्याचा सतत भास होत होता.
ती मग मनाशीच बोलू लागली- ‘का सतावताहेत मला ही वाक्ये? त्यानंतर ही काही पहिली नवरात्र नाही माझी, मग आता याच वेळी असं का होतंय मला? नक्कीच विधात्याची काही योजना असेल यामागे. काहीतरी करवून घ्यायचं असेल त्याला माझ्याकडून. काय समे, कुठल्या युगात वावरते आहेस तू? हं, कदाचित मीच जरा जास्त विचार करतेय. नाही नाही हे थांबलं पाहिजे.’
पण काही केल्या ती वाक्ये तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हती. नवरात्रोत्सव सुरू झाला, घरात घटस्थापना झाली; पण समीक्षा?
तिचा प्रत्येक दिवस उजडत होता तो त्या वाक्यांनी आणि त्याच वाक्यांनी तो मावळतही होता. आपलं आयुष्यं जणू एका चक्रात अडकल्यासारखे पुन्हा पुन्हा तिथेच येतेय असं तिला वाटायला लागलं होतं. दोन वर्षांपूर्वीची समीक्षा आणि आत्ताची समीक्षा दोघी एकमेकींभोवती फिरत होत्या. जणू त्यांनी नवरात्रीच्या सणात फुगड्यांचा फेरच धरला होता!
संपूर्ण कथा खालील लिंकला जाऊन वाचा:
https://lekhanisangram.com/durge-durghat-bhari-part-1/
https://lekhanisangram.com/durge-durghat-bhari-part-2/
ही कथा खालील मंचांवर देखील ऐकू शकता :
My website:
https://lekhanisangram.com
Follow me on
Facebook:
https://www.facebook.com/sangramsingh.kadam/
https://www.facebook.com/lekhanisangram/
Instagram:
https://www.instagram.com/lekhanisangram/
https://www.instagram.com/sangramsinghkadam/
Apple Podcast:
https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418
Spotify:
https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB
Amazon Music:
https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta
Anchor FM:
https://anchor.fm/sangramsingh-kadam
Stitcher:
https://www.stitcher.com/show/sangramcha-katta
Google Podcast:
https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA