रामकुटी | Ramkuti

प्रसाद हा मज द्यावा देवा स्वर श्रीकांत


Listen Later

श्रीराम
प्रसाद हा मज द्यावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा ।
सहवास तुझाची घडावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा ।। धृ ।।
निशीदीन प्रभुचे नाम स्मरावे ।
विसर तुझा न पडावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा -- । १ ।
ह्रदय मंदिरी तुवा बैसोनी ।
ध्यान योग मज द्यावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा -- । २
हरिभजनांमृत निशीदीनी पाजुनी ।
जन्म मृत्यू चुकवावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा -- । ३ ।
आत्मसुखा परी प्रसाद द्यावा ।
वियोग तव न घडावा देवा ।
प्रसाद हा मज द्यावा -- I ४ I
#सहवास तुझाची घडावा देवा ।
#प्रसाद हा मज द्यावा ।
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏼
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

रामकुटी | RamkutiBy Shrikant Borkar