Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast

" पुस्तक परिचय " !! - Shilpa Inamdar Yadnyopavit


Listen Later

तुमच्या मुलांना भीती वाटते का ? तुमची मुलं हट्टीपणा करतात का ? तुमच्या मुलांना राग येतो का? तुम्हाला तुमच्या मुलांशी नेमका कसा संवाद साधायचा असा प्रश्न पडतो का ? त्यांच्या शालेय जीवनाबद्दल काळजी वाटते का ? या सगळ्यांची उत्तरं जर हो अशी असतील तर हे सदर तुमच्याच साठी आहे !!! पालकत्वा विषयी चौफेर माहिती तुम्हा सगळ्यांसाठी एकाच ठिकाणी उपलब्ध असावी या प्रामाणिक हेतूने आज पुन्हा एक नवा प्रयोग करायचा असं ठरवलं . आपण बरेचदा या विषयावरची खूप पुस्तकं बघत असतो , कधी वाचली जातात तर कधी वाचायची ठरवून विसरली जातात.. कधीकधी त्यात नेमकं काय आहे आणि ते आपल्याला खरंच उपयोगी पडणारे का ? हे नीट माहिती नसतं . अनेकदा तर बरीच चांगली पुस्तकं माहितीही नसतात. इच्छा तर असते पण वेळ नसतो .... एक ना अनेक . याच साठी हा एक मदतीचा हात देण्याचा छोटासा प्रयत्न . एक नवीन सदर जे अधून मधून तुमच्या भेटीला येत राहणार आहे ," पुस्तक परिचय "!!! अर्थातच आपल्या विषयाशी निगडीत असलेल्या !! मग त्यात आपल्याला काय भावलं , content काय आहे ? त्यातल्या काही भागाचं वाचन , त्यामधून आपल्याला काय मिळालं ? त्या पुस्तकाशी निगडित एखादी आठवण , त्याचे लेखक, प्रकाशक यांचे तपशील अशा गोष्टींचा समावेश असेल.

या सदराची सुरुवात मी मला खूप आवडलेल्या आणि माझ्या आवडत्या लेखिकेच्या एका पुस्तकाने करणारे !!! कोणतं ? पुस्तकाचं नाव आहे, अशी का वागतात मुलं ? उन्मेष प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं , डॉ. श्रुती पानसे यांचं हे पुस्तक आहे . शंभर च पानांचं पण शंभर नंबरी पुस्तक आहे हे !!! याच पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवले आहेत आजच्या आपल्या "पुस्तक परिचय" या नवीन सदराच्या आजच्या भागात , नक्की ऐका आणि आवर्जून हे पुस्तक वाचा !!! 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi PodcastBy Shilpa Inamdar Yadnyopavit

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

2 ratings