मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

S2.E1 - शिक्षणाची वाट शोधताना - केतन देशपांडे सोबत गप्पा


Listen Later

रस्ता लांबचा आहे.

पुस्तकी शिक्षणापासून ते कौशल्य आधारित शिक्षणापर्यंतचा आहे.
शिक्षणापासून नोकरीपर्यंतचा आहे.
कुठे आर्थिक प्रगतीचा आहे तर कुठे जगण्याच्या संघर्षाचा आहे.
माहितीचा महापूर किंवा दुष्काळ यापासून योग्य ती माहितीचा असण्याचा आहे.

या रस्त्यावर ठेच खाल्लेल्या पण त्यानंतर दुसऱ्यांना शहाणे करून सोडण्याचा संकल्प सोडलेल्या केतनशी आम्ही या भागात गप्पा मारल्या आहेत.

वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी Friends Union for Energising Lives (F.U.E.L.) ही NGO स्थापन करून भारतातल्याच नव्हे तर परदेशातल्याही लाखो मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आत्मनिर्भर होण्यासाठी विश्वास देणारा असा हा केतन देशपांडे आता कौशल्य आधारित शिक्षणासाठी सुसज्ज असे विद्यापीठ पुण्यात लवकरच सुरु करतोय. 

आजूबाजूच्या परिस्थितीला केवळ दोष देण्यापेक्षा आपल्या परीने शिक्षणाला केवळ नोकरी/उद्योगाशीच नाही तर जगण्याशी जोडून घेणारा केतनचा प्रवास, आणि त्याचे विचार नक्की ऐका. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे पण जरूर कळवा.

#youth_empowerment #social_entrepreneurship #STEM #शिक्षण #कौशल्य_आधारित_शिक्षण #रोजगार 


या भागात आलेले संदर्भ: 

केतन देशपांडे

Friends Union for Energising Lives

Atal Tinkering Labs 


वटवटकार: पराग, सागर आणि रोहित


प्रतिक्रियेसाठी :

Facebook: https://www.facebook.com/MetkootPodcast

Instagram: https://www.instagram.com/metkootpodcast/
Twitter: https://twitter.com/metkootPodcast

https://www.youtube.com/watch?v=B7ytTj1ALdw

#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)By Vatvatkaar