मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

S2.E2 - भाषेच्या नावानं चांगभलं


Listen Later

मातृभाषा हा खूप मजेशीर विषय आहे. शाळा होती तोपर्यंत भीती वाटायची आणि शाळा सोडल्यावर अभिमान वाटू लागला. मग आता "आपली" भाषा टिकावी, वाढावी, समृद्ध व्हावी या हट्टापायी भलेबुरे प्रयत्न आपण करतोच की. हे आत्ताच असं नाही. हे पूर्वापार चालत आलंय. पण भाषेच्या वृद्धीसाठी भाषेवर प्रेम परता आलं पाहिजे हेच खरं. मग ती स्वतःची असो, किंवा दुसऱ्याची.

तुम्हाला काय वाटतं?

शुद्ध-अशुद्ध भाषा, लिपी, व्याकरण, दुसर्‍या भाषेतून आलेले शब्द, भाषेतून वाहणारी संस्कृती, परंपरा, अस्मिता असा हा सगळा भाषेचा  नुसताच पसारा आहे की भाषेचे सौंदर्य वाढविणारा पिसारा आहे? एक विषय म्हणुन शाळेत शिकण्यात, नंतर भाषा टिकवण्यात आणि त्याच्या राजकारणात भाषेतील गम्मत समजायची राहून जाते का?

आजच्या या भागामध्ये आम्ही या सगळ्यांमधल्या गंमतींवर गप्पा मारलेत. वेगवेगळ्या भाषेतील भन्नाट किस्से, आणि त्यातले बारकावे सांगायला आमच्यासोबत आहे अर्निका परांजपे. 

अर्निकाची लेटेस्ट आणि आमच्या आवडीची ओळख म्हणजे तिचं "बांधणीच्या कविता" हे युट्युब चॅनेल. तिथे ती मराठी कवितांच्यातलं "मीटर" आणि ताल हे सगळं उलगडून सांगते. तिच्या चॅनेलला भेट दिला नसाल, तर आवर्जून द्या.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter

या भागामध्ये आलेले संदर्भ:

१. https://timesofindia.indiatimes.com/life-style/spotlight/different-languages-spoken-by-the-british-royal-family/photostory/80214184.cms?picid=80214200 

२. रोमन लिपीत लिहिलेल्या बॉलिवूडच्या पटकथा 

३. https://en.wikipedia.org/wiki/Eliezer_Ben-Yehuda

४. हिब्रूचं पुनरुज्जीवन  

५. सफरचंद 

६. माधव ज्युलियन यांची छंदोरचना

७. सुनीता देशपांडेंचे कविता वाचन  भाग १, भाग २

८. केवढे हे क्रौर्य

९. Why is Manike Mage Hithe so catchy? 

१०. Iambic pentameter

११. रुडयार्ड किपलिंगची "If" कविता

१२. https://www.theguardian.com/books/2020/sep/10/when-we-cease-to-understand-the-world-by-benjamin-labatut-review-the-dark-side-of-science

१३. बहादूर अलास्त याचं युट्युब चॅनल : पोर्तुगीज आणि मराठीतली साम्य / संस्कृत आणि पर्शियन मधील साम्य

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)By Vatvatkaar