मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

S2.E5 - वाचाल तर वाचाल - विनायक रानडे यांच्यासोबत गप्पा


Listen Later

आपण 'ऑनलाईन' जगात नेहेमी 'कनेक्टेड' राहतो असं आपल्याला वाटतं. पण आपल्या जवळच्या माणसांच्या वाढदिवसाची आठवण करून देण्यासाठी, "हे पुस्तक/विडिओ/ सिनेमा/गाणे  तुला आवडू शकेल' असं सांगण्यासाठी आणि अगदी घरपोच आणून देण्यासाठी सुद्धा आपण चेहरा नसलेल्या एका मोठ्या तांत्रिक व्यवस्थेवर अवलंबून असतो. त्याचे फायदे आपल्या सगळ्यांना माहिती आहेतच.  

पण या गोष्टी ऑफलाईन करणारा एक माणूस याच जगात आणि याच काळात वावरतोय यावर तुमचा विश्वास बसेल?  

तुम्ही विचाराल कोण आहे हा माणूस ?आणि मुख्य म्हणजे का करतो हे असं काही?  

हा माणूस म्हणजे "ग्रंथ तुमच्या दारी" ही चळवळ उभी करणारे आणि पुस्तकांना लोकांपर्यंत घेऊन जाणारे पुस्तक-वेडे व्यक्तिमत्व विनायक रानडे. मेतकूट च्या आजच्या भागातले पाहुणे.  

आता दुसरा प्रश्न - पण का? 

"पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचावी" या पेक्षाही मोठे, महत्वाचे आणि मनाला समाधान देणारे काहीतरी आहे हे विनायक रानडे यांच्याशी बोलताना सतत जाणवते. ते काय आहे हे समजण्यासाठी मात्र तुम्हाला एपिसोड ऐकावं लागेल. आणि हो ते काय आहे असे वाटते ते पण आम्हाला जरूर कळवा. बघूया या निमित्ताने आपण 'कनेक्ट' होतोय का?  

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter


"ग्रंथ तुमच्या दारी" यासंदर्भात विनायक रानडे यांच्याधी संपर्क साधण्यासाठी

+91 9922225777 (फक्त बोलण्यासाठी)
+91 9423972394 (फक्त व्हाट्सएपसाठी)
(ग्रंथ तुमच्या दारी - लंडन मध्ये)

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)By Vatvatkaar