मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

S2.E6 - आज खानेमें क्या है? - प्रीती आणि राजेश सोबत गप्पा


Listen Later

अन्न हे पूर्णब्रह्म, असं ऐकत आपण सगळे मोठे झालो. पण या देवासमान अन्नामध्ये दडलेल्या तेहेतीस कोटी छटा यांची ओळख कधी बरं झाली? भारताबाहेर पडल्यावर, भारतीय जेवण म्हणजे पंजाबी जेवण अशा ओळखींमधून बाहेर येता येता आपण दक्षिण भारतीय जेवणाच्या वळणाला लागून आत्ता कुठं थोडं फार मराठमोळ्या पक्वांनांपर्यंत व्याख्या रुंदावू शकलोय. पण याच्याही पलीकडे आपण जे खातो, जसे खातो, त्याचा इतिहास, त्याचा लहेजा, त्यामागच्या रूढी आणि परंपंरा उलगडून दाखवणारा, त्याची माहिती जाणून घ्यायला उत्सुक करवणारा उपक्रम राबवणारी व्यक्ती म्हणून प्रीती आणि राजेश देव यांची ओळख. त्यांच्या याच उपक्रमाबद्दलची अधिक माहिती, त्यामागची प्रेरणा आणि त्यांना आलेले अनुभव जाणून घेणे हा यंदाच्या एपिसोडचा उद्देश. 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter


या भागात आलेले संदर्भ: 

Two Hands UK / My UK Kitchen 

रुचिरा / Julie & Julia / नल पाकदर्पण / भोजनकुतूहलम / सूपशास्त्र / Paat Paani

दीन मोहम्मद शेख / आजीबाई बनारसे / वेणूताई चितळे  

मनोज वसईकर / पूर्णब्रम्ह (जयंती कठाळे) / Chef's Table

Shank's (film) / भारतीय पाककृतींची अन्नयात्रा

Ethopian Cuisine in Spitalfields Market / झोमॅटो-स्विगी ची चलती 

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)By Vatvatkaar