मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

S2.E7 - Fourier Transform, Inventions and Passion


Listen Later

शाळा कॉलेजमध्ये धो धो शिकून पुढे कॉर्पोरेट कल्चर मध्ये घुसल्यानंतर धक्का बसल्यासारखं होतं का? कोणत्या गोष्टी बदलतात? कोणत्या गोष्टी आधीच माहिती असत्या तर बरं झालं असतं असं वाटतं? कधी हा विचार मनात येतो का की आपल्याकडे व्हाट्सऍप, फेसबुक किंवा इतरही नवे शोध का बरं लागले नसतील? नासामध्ये बसून उपग्रह सोडणं महत्त्वाचं की एखाद्या गावात लाईट बल्ब लावणं महत्वाचं अशा स्वरूपाचा प्रश्न पडून तुमचा मोहन भार्गव होतो का?

अशाच काही प्रश्नांची उजळणी, आणि काही उत्तरांची नव्याने ओळख असा आजचा भाग घेऊन आम्ही आलेलो आहोत. हे चर्चा सत्र अजून लांबेल असं दिसतंय. तेव्हा पुढचा भाग घेऊन लवकरच परत येऊ. आणि तेव्हा तुमच्यापैकी कोणाला आपलं मत मांडायचं असेल, तुमचा एखादा वेगळा मुद्दा असेल, तर जरूर सांगा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)By Vatvatkaar