कोविड लॉकडाऊनचा उपयोग करून मी अरबी भाषा पुन्हा शिकण्यासाठी वेळ घेतला आणि ऑनलाइन शिक्षण साधन 'नोव्हेल अरबी,' (https://novel-arabic.com) लिहिले, जे ऑडिओ आणि मजकूरासह साहसकथांचा वापर करुन अरबी शिकणे सोपे करते. या पद्धतीच्या मूलतत्वामध्ये ऐकुन आणि वाचून समजून घेण्यावर भर दिला जातो, जे समजल्या जाणाऱ्या इनपुटचे अधिकतमीकरण करण्यावर आधारित आहे.