Sign up to save your podcasts
Or

कोणतेही शास्त्रीय संशोधन पूर्णतः नवीन, स्वतंत्र असत नाही. आपल्या संशोधनविषयाशी प्रचलित सिदधांत उपलब्ध असू शकतात, किंबहुना असतातच. अशा सिद्धांतांचा शोध घेऊन त्यांच्या आधारे आपल्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, रूपरेषा आणि व्याप्ती ठरवणे, अभ्यासाची चौकट आखून घेणे महत्त्वाचे आहे. ते ठरवणे हा संशोधनप्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. सैद्धांतिक चौकट ठरवणे म्हणजे त्या सिद्धांताचा पुरस्कार करणे नव्हे. तर दिशादर्शनासाठी त्याचा वापर केला जातो. संशोधनाच्या अंती त्या सिद्धांताला पुष्टी मिळू शकते किंवा त्याचा प्रतिवादही केला जाऊ शकतो.
सैद्धांतिक चौकटीचे महत्त्व पटले तरी संज्ञापनाविषयीचे सिद्धांत माहीत नसणे हा एक मोठा अडसर ठरू शकतो. त्यासाठी https://www.communicationtheory.org/ या संकतस्थळावरील यादीचा उपयोग होऊ शकतो. मात्र त्यावर दिलेल्या सिद्धांतांविषयी अधिक सखोल वाचन करणे आवश्यक आहे. डेनिस मॅक्वेल यांचे ‘मास कम्युनिकेशन थिअरी’ हे पुस्तकदेखील उपयुक्त आहे. स्टीफन लिटलजॉन व केरेन फॉस यांनी संपादित केलेला ‘एनसायक्लोपीडिया ऑफ कम्युनिकेशन थिअरी’ हा दोन खंडांचा कोशही चांगला संदर्भस्रोत आहे.
काही सूचना, शंका असल्यास जरूर [email protected] या इमेल पत्त्यावर संपर्क करा.
By Ujjwala Barveकोणतेही शास्त्रीय संशोधन पूर्णतः नवीन, स्वतंत्र असत नाही. आपल्या संशोधनविषयाशी प्रचलित सिदधांत उपलब्ध असू शकतात, किंबहुना असतातच. अशा सिद्धांतांचा शोध घेऊन त्यांच्या आधारे आपल्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, रूपरेषा आणि व्याप्ती ठरवणे, अभ्यासाची चौकट आखून घेणे महत्त्वाचे आहे. ते ठरवणे हा संशोधनप्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. सैद्धांतिक चौकट ठरवणे म्हणजे त्या सिद्धांताचा पुरस्कार करणे नव्हे. तर दिशादर्शनासाठी त्याचा वापर केला जातो. संशोधनाच्या अंती त्या सिद्धांताला पुष्टी मिळू शकते किंवा त्याचा प्रतिवादही केला जाऊ शकतो.