बहुदा अनेक घरात असंच होत असतं....
घरात दोन भावंडं असली की मोठ्याला नेहमी नवीन गोष्टी मिळतात आणि त्याच्या वापरलेल्या गोष्टी मग धाकट्याला.
खरं तर यात दडलेलं असतं प्रेम, आणि जिव्हाळा.
मोठयाने काळजीने सांभाळून गोष्टी वापरायच्या आणि मग त्या लहान भावाला द्यायच्या यातूनच लहानपणापासून आपल्या छोट्या भावाची जबाबदारी मोठा भाऊ घेत असतो.
पण या गोष्टी जेंव्हा घरात येणारी तिसरी व्यक्ती आपल्या दृष्टिकोनातून पाहते तेंव्हा....
तेव्हा काय येत असेल तिच्या मनात ??
ऐकूयात या आजच्या कथेतून...