Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast

शाळा नेमकी असते कशासाठी ? - with Rushikesh Dabholkar [Founder-Atakmatak.com, storyteller & freelance writer]


Listen Later

घरात मूल जन्माला यायचा अवकाश पालकांना त्याच्या उज्वल भवितव्याविषयी निर्माण होणाऱ्या काळजीत "शाळा" हा फार महत्वाचा मुद्दा असतो !! त्यावरून घराघरांत काय घडतं? ते वेगळं सांगायला नको ..आणि ते पूर्णतः चुकीचं आहे असंही नाही पण तरीही आपण आपल्या मुलासाठी एखादी शाळा का निवडतो? त्यासाठी कुठले निकष पडताळतो ? अमुक शाळा माझ्या मुलासाठी बेस्ट असेल हे कुठल्या परिमाणांवर तपासतो ? असे अनेक प्रश्न बऱ्याच पालकांना पडलेलेच नसतात की फक्त so called reputed असणाऱ्या ठिकाणी पैसे भरणे हे एकच आपलं आद्यकर्तव्य आहे असं वाटू लागलंय हेच कळेनासं झालंय ...शाळा नेमकी असते कशासाठी ? हा प्रश्न कधी पडतो का आपल्याला ? पडला असेल आणि त्याचं उत्तर हवं असेल तर आजचा भाग नक्की ऐका !! या बद्दल अतिशय रास्त आणि सुयोग्य पद्धतीने विवेचन करून देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत ऋषिकेश दाभोळकर !!! प्रोफेशनली इंजिनियर आणि पॅशनेटली लेखक , स्टोरीटेलर आणि बरंच काही !! मुलांसोबत आणि मुलांसाठी काम करायला खूप आवडतं म्हणून त्यांनी अटकमटक. कॉम ची निर्मिती केली. पालकनिती, चिकूपिकू अश्या मासिकांतून तसंच अक्षरनामा, ऐसी अक्षरे आदी अंकांमध्ये, लोकमत सारख्या वृत्तपत्रातून ते सातत्याने लिखाण करत असतात. गोष्टींचे अभिवाचन करणे, नाट्यमय सादरीकरण करणे, मुलांशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणे या गोष्टी मनापासून करणारा मुलांचा लाडका ऋषिकेश दादा एक संवेदनशील कवी मनाचा 'बाबा' देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा या multi talented व्यक्तिमत्वाला आपल्या सेल्फलेस पेरेंटिंग च्या आजच्या भागात.... 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi PodcastBy Shilpa Inamdar Yadnyopavit

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

2 ratings