रामकुटी | Ramkuti

श्रीदुर्गा द्वात्रिंशन्नाममाला स्तोत्र


Listen Later

*येत्या २३ जून २०२४ पासून येणाऱ्या अत्यंत मोठ्या वाईट योगाची माहिती देणारा लेख अत्यन्त ज्ञानी ज्योतिषाभ्यासक श्री.भरत नाबरिया यांनी लिहिला आहे. आपल्या पंचांगामध्ये नेहमीच पंधरा-पंधरा दिवसांचे दोन पक्ष असतात. कधी ते १४ दिवसांचे पण होतात. तिथींच्या क्षय- वृद्धीमुळे क्वचित ते सोळा दिवसांचेही होतात. पण अतिशय कमी परिस्थितीमध्ये तेरा दिवसांचा पक्ष होतो. अत्यंत क्वचित येणारा असा हा योग असतो. ह्याला 'रौरवकाल योग' असे म्हणतात. ह्या योगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनहानी व धनहानी होत असते. श्रीदत्त माहात्म्यामध्ये सांगितलेल्या सात इती म्हणजे १)अनावृष्टी म्हणजे अजिबात पाऊस न पडणे, २)अतिवृष्टी म्हणजे अत्यधिक पाऊस पडणे, ३)टोळधाड म्हणजे असे किडे जे संपूर्ण अन्नधान्य खाऊन टाकतात. ४)भूकंप ५) परचक्र म्हणजे दुसऱ्या देशाकडून आक्रमण, ६)मोठ्या प्रमाणात संक्रमणामुळे होणारे रोग जसे कोरोना,७) देशात बंड होणे असे अनेक उपद्रव निर्माण होतात.
असा योग द्वापारयुगात महाभारत युद्धाच्या आधी तेरा दिवसांचा कृष्णपक्ष आला होता,त्यावेळी आला होता.आता पुन्हा यावेळी २३ जूनला आपल्या देशात असा योग परत येत आहे. ज्येष्ठ कृष्णपक्षात प्रतिपदेचा क्षय होऊन द्वितीयेपासून ज्येष्ठ कृष्णपक्ष सुरू होतोय आणि नंतर त्रयोदशी तिथीचा क्षय झालेला आहे. यामुळे महाराष्ट्रात तेरा दिवसांचा ज्येष्ठ कृष्णपक्ष आलेला आहे. उत्तर-पूर्व भारतात मात्र द्वितीयेचा आणि चतुर्दशीचा क्षय झालेला आहे.त्यामुळे उत्तर भारतात अधिक मोठ्या प्रमाणावर दुर्योग निर्माण झालेला आहे. यामुळे उत्तर भारतात पूर येणे किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी,काही ठिकाणी अनावृष्टी, काही ठिकाणी रोगराई, काही ठिकाणी बंड हे असे होऊ शकते. महाभारत काळात दुर्योधनाची सत्ता पालटली होती. या वाईट काळात
धर्मशास्त्रानुसार कोणत्याही प्रकारचा व्रतारंभ,मंगल कार्य, कोणत्याही व्रताचे उद्यापन त्यानंतर घराची, जमिनीची खरेदी विक्री,गृहप्रवेश करू नये. सर्व प्रकारची शुभ कार्ये टाळावीत.याबाबतीत श्री.भरत नाबरिया यांनी आजच दाते पंचांगकर्ते आणि या क्षेत्रातील अधिकारी आदरणीय श्री.मोहनराव दाते यांच्याशी संपर्क केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या महाराष्ट्रात प्रतिपदेचा लोप होत आहे. त्यामुळे हा तेवढा मोठ्या प्रमाणावर वाईट नाही आहे जर प्रतिपदेचा लोप न होता द्वितीयेचा लोप झाला असता तर मात्र हा योग फार वाईट झाला असता.पूर्वोत्तर भारतात मात्र द्वितीयेला लोप असल्यामुळे उत्तर भारतात याचा परिणाम जास्त मोठ्या प्रमाणावर दिसून येईल. श्री.भरत नाबरिया यांच्या मते परत एकदा अरुणाचल, मणिपूर, नागालँड, मिझोराम, आसाम अशा पूर्वोत्तर राज्यांमध्ये काही उपद्रव होऊ शकतो. पूर्वोत्तर राज्यांत ह्याचे परिणाम तीव्रतेने दिसून येऊ शकतात. चीनचे आक्रमण होऊ शकते. कुठल्याही एखाद्या मोठ्या प्रदेशात युद्ध किंवा तत्सम कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर जनधन हानी झाली तरी त्याचा
संपूर्ण परिणाम संपूर्ण देशावर होतच असतो. हे सर्व टाळण्याकरता मोठे सिद्ध पुरुष प्रयत्नशील असतात, आताही आहेत. पण श्री.भरत नाबरिया यांचे म्हणणे असे आहे की, आपण सर्वांनीही या देशाचे जबाबदार नागरिक या नात्याने शांततेकरता, सुबत्तेकरता, या देशाकरता काही विशेष अनुष्ठान सुरू करावे.पू.स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात,देहाकडून देवाकडे जाण्याच्या मार्गात मध्ये देश आणि धर्म लागतात ,त्या देश आणि धर्मासाठी नित्य काही ना काही करत राहाणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे.हा योग २३ जून
ते पाच जुलै २०२४ पर्यंत हा योग चालू राहील. या संपूर्ण ज्येष्ठ महिन्यातील ग्रहस्थितीसुद्धा फार विचित्र आहे. प्लूटोसारखा अत्यंत संहरक ग्रह शनीच्या राशीत अष्टमस्थानी आहे. अष्टमस्थान स्वाभाविकच अत्यंत वाईट स्थान आहे.६ जूनची वैशाख अमावास्या, जी शनिदेवाची जयंती अमावास्या असते ती चंद्राच्या नक्षत्रात होत आहे आणि ज्येष्ठ महिन्याची अमावास्या राहूच्या नक्षत्रात होत आहे.
अमावास्यांचे हे योग आणि
या दरम्यान असणारे इतर काही ग्रहयोग हे विचित्र आहेत.
प्लूटो ग्रह शनीच्या राशीत गोचर कुंडली मध्ये अष्टमस्थानी आलेला आहे.
यावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रासाठी संकल्पपूर्वक दुर्गा देवीच्या ३२ नावांचे अतिशय छोटे साताठ ओळींचे एक स्तोत्र तीन जून पासून पुढे ४० दिवस म्हणजे १३ जुलैपर्यंत ३२ वेळा म्हणायचे आहे. यासाठी फक्त २०- २५ मिनिटांचा वेळ लागेल. मी ते स्तोत्र व त्याचे रेकॉर्डिंग आपणां सर्वांना पाठवते.
डॉ. अपर्णा कल्याणी,सोलापूर
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

रामकुटी | RamkutiBy Shrikant Borkar