Eschoolforall

Spiritual awakening organization's MISSION AVANI MOVEMENT.


Listen Later

आज, "वसुंधरा दिन "-22.04.2023
असं म्हणतात की चांगल्या गोष्टींसाठी मुहूर्त लागत नाही.
अस्तित्वात खूप साऱ्या गोष्टी,आपल्या आकलना बाहेरच्या, अवाक्या बाहेरच्या असतात.
सततच्या चाललेल्या पृथ्वीवरील ग्लोबल वॉर्मिंग, टेम्परेचर चेंजेस,कचरा आणि त्या विषयीच्या समस्या, दुर्मिळ प्राणी- पक्षी संवर्धन इत्यादी आणि
इतक्याच चर्चा ऐकणे आणि मी काय करणार
ह्यात!म्हणून सोडून देणे हेच आपण सगळे वर्षानुवर्ष करत आलोय.
पण जर आपण अशा 5000हून जास्त विविध समस्याची आणि त्यावरील विविध तोडग्यांची माहिती घेऊन, आपल्याला जमेल तसें प्रत्येकाने काटेकोरपणाने पृथ्वीची/ वसुंधरेची /आपल्या आईची, काळजी घ्यायची म्हटली तर बघता बघता दृश्य पालटू शकते.
Spiritual awakening organization (अध्यात्मिक प्रबोधन संघटन /संस्था )
या संस्थे मार्फत,आज मी Founder मेंबर म्हणून तुम्हाला सगळ्यांना अतिशय आनंदाने सांगू इच्छिते की जगातील पर्यावरणवादी /सजग लोकांना एकत्र करून त्यांच्या मार्फत अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आणि पृथ्वीच्या जतन आणि संवर्धना साठी आम्ही नुसते उपक्रमच राबवणार नाही आहोत तर, तुमच्या घरी,आजूबाजूला, गावात, शहरांत, राज्यात, देशात, परदेशात;
"लोकल ते ग्लोबल "
ह्या रीतीने अभ्यासक्रम ही राबवणार आहोत.
बऱ्याच आई वडिलांची खंत असते... आम्ही तर सजग आहोत, आमच्या मुलांना कोण शिकवणार?
शाळेमध्ये शिकवले जातात काही अंशी असे विषय,
पण कोणत्याही उपक्रमाबद्दल
सखोल माहिती, जगात जगताना हवी असलेली सतर्कता,
आपल्या प्रत्येक कृतीतून निसर्गाला होणारी हानी किंवा फायदा ह्याचा हिशोब ठेवणं गरजेचं आहे.
रोजचं स्वतःच काम /व्यवसाय सांभाळून आपण सर्वांनीच सजगता दाखवली तर वेळीच विविध उपाययोजना राबवून, निदान पुढचं आयुष्य तरी आपण
नुसताच पृथ्वीवरील साधन संपत्ती चा वापर करून, इथली परिस्थिती पुढच्या पिढीसाठी अजून बिकट न करता..,
आजच असा संकल्प करूयात की आपण जसे आपल्या घरच्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून आपल्या स्वभावात योग्य ते बदल करतो, काही वेळा आपल्या वागण्याला मुरड घालतो,तसेच आपण जन्माला आल्यापासून आज वर जो काही निष्काळजीपणा पर्यावरण आणि पृथ्वीबद्दल दाखवला आहे त्याची भरपाई म्हणून, आपल्या वागण्यात योग्य ते बदल करून, पुढच्या पिढीसाठी,
पृथ्वीच्या जतन संवर्धनासाठी जे काही प्रयत्न लागतील ते एकत्र होऊन करूयात.
राष्ट्रप्रेम, देशाभिमान ह्या फक्त पोकळ भावना नसून,
देशाप्रती आपली वागणूक, योग्य व जाणीव पूर्वक असणं गरजेचं आहे.
नागरिक म्ह्णून देशाच्या सार्वजनिक मालमत्ते विषयी काळजी घेणं हेही आपलं कर्तव्य आहे.
वय वर्ष 5पासून सर्वांसाठी आम्ही अभ्यासक्रम म्हणून जे विषय ठेवलेत ते विविध शाळा, कॉलेज, कंपन्या, कार्यालये/ ऑफिसेस, सोसायट्यामध्ये राबवले जाऊन,Eco system बद्दल सजगता निर्माण करणे आणि समस्यांवार ठोस उपाय काढणे हा आमचा हेतू आहे.
केल्याने होत आहे रे,आधी केलेची पाहिजे.
अधिक माहिती -
जर
01.तुम्हाला ह्या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल.
02.तुमच्या भागातले रोल मॉडेल व्हायचे असेल,त्यासाठी ट्रेनिंग हवं असेल.
03तुमच्या घरी, कॉलनी, शहरामध्ये कोणते सोपे, सजग उपक्रम तुम्ही राबवू शकता त्याची माहिती हवी असेल किंवा
04.हा अभ्यासक्रम तुम्ही कसा शिकू शकता /तो तुमच्या मुलांना, कुटुंबाला कशा रीतीने शिकवू शकता,
ह्याची अधिक माहिती तुम्हाला +91-7743855533ह्या नंबर वर संपर्क करून मिळेल.
सोबत Spiritual awakening organization च्या "मिशन अवनी " [MISSION AVANI ]
बद्दल माहिती सांगणारा एक मुलाखतीचा ऑडिओ पाठवीत आहे.
जो एकंदरीत आमच्या उपक्रमांचा अंदाज देईल.
असे विविध उपक्रम आम्ही संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर
राबवित आहोत.
एखादे चांगले कार्य देशाचा कायापालट कसे करू शकते,हे सिद्ध करणे, हा आमचा मानस आहे.
जातींचे, धर्माचे,वयाचे, बंधन न बाळगता,
सामाजिक भान आणि पर्यावरणा विषयी काळजी, प्रेम असणारे विविध व्यावसायिक,व्यापारी,तज्ज्ञ, मार्गदर्शक, होतकरू विद्यार्थी, कर्तव्य दक्ष, सजग गृहिणी,आम्हाला ह्या उपक्रमा मध्ये साथ देत आहेत.
गरज आहे ती वसुंधरेच्या प्रेमापोटी तुम्हीही एक पाऊल पुढे टाकण्याची.
Dr. Swarupa Kiran Chougule
Founder
Spiritual awakening organization.
Sangli
Mobile no.7743855533.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

EschoolforallBy Eschoolforall