Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast

Techno "logical" Awareness !! -with Prasad Shirgaonkar [Technologist by profession & writer-poet-photographer by passion]


Listen Later

सध्या टेकनॉलॉजि आणि मुलं हा कळीचा मुद्दा झालाय आणि पालकांना त्या बाबतीत सजगपणे विचार करणं खूप गरजेचं आहे सध्याच्या काळात ..टेक्नॉलॉजी च्या नावाने फक्त खडे फोडण्यापेक्षा तिच्याबरोबर समतोल साधत कसं जगायचं हे आता शिकलं पाहिजे कारण ती आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनत चालली आहे !! मुलं तर या बाबतीत ४ पावलं पुढे असणारच आहेत पण त्यांना त्यातले धोके माहिती असतील च असं नाही; त्यांना त्यापासून सावध करण्यासाठी , त्यांची मदत करण्यासाठी आपल्यालाही 'techno -literate ' असणं खूपच गरजेचं आहे आताच्या काळात. आणि म्हणूनच हा समतोल साधत technology चा चांगला उपयोग कसा करता येईल याबद्दल जाणून घेऊया आपल्या आजच्या एपिसोड मध्ये 

२०२२ ची सुरुवात एका अत्यंत versatile guest सोबत करण्याची संधी मिळाली !! आजवर अनेक वर्तमानपत्रांतून , नियतकालिकांमधून , सोशल मिडिया च्या माध्यमांतून आपल्याला वरचेवर भेटणारा, त्याच्या ओघवत्या आणि सहजसोप्या लिखाणातून अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारा मोकळ्या मनाचा लेखक, दिलखुलास हसणारा, हसवणारा आणि नकळत डोळ्यांच्या कडा पाणवण्याची ताकद असणारा संवेदनशील कवी, एक उत्तम फोटोग्राफर आणि त्याचबरोबर अतिशय हुशार असा तंत्रज्ञ म्हणूनही नावाजलेला प्रसाद दादा अर्थात प्रसाद शिरगांवकर !!! एखादी व्यक्ती creative आणि intellectual दोन्ही पातळ्यांवर तेवढीच बेस्ट असू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसाद दादा .

चला तर मग, techno 'logical' awareness विषयी जाणूनन घेऊया प्रसाद दादाकडून !!!

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi PodcastBy Shilpa Inamdar Yadnyopavit

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

2 ratings