Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast

व्यसनाधीनता पालकांची...परवड मुलांची... ऐकूया दुसरी बाजू !!! - with Mrunmayee Agnihotri [Psychologist & Facilitator - IPH Thane]


Listen Later

प्रत्येक एपिसोड मधून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पालकत्व उलगडण्याचा सतत प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ; Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या माध्यमातून मी तुमची होस्ट शिल्पा आज पुन्हा एकदा एक वेगळा आणि नवीन perspective घेऊन आलेय !!! घरात असलेल्या ADDICTION या गोष्टीचा मुलांवर कसा परिणाम होतो ? ते यामध्ये कसे भरडले जाऊ शकतात ? त्यांच्या मनात अशा वातावरणामुळे काय आंदोलनं निर्माण होतात ? त्याचे त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि आयुष्यावर काय आणि कसे पडसाद उमटतात ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दयायला आज आपल्याबरोबर अशाच परिस्थितीला एक मूल म्हणून सामोरी गेलेली आणि त्यातून खूप सकारात्मक पध्दतीने बाहेर येऊन स्वतःवरच नाही तर अशा परिस्थितीतून जाणाऱ्या सगळ्या मुलांसाठी काम करणारी आणि त्यांच्या मदतीसाठी IPH या संस्थेमार्फत "अंकुर" नावाचा मदतगट चालवणारी मृण्मयी अग्निहोत्री !!! मृण्मयी आज आपल्यासोबत ती दुसरी बाजू शेयर करणारे जी खूप जास्ती महत्वाची आहे ... मुलांची बाजू !!! व्यसनाधीन व्यक्तींच्या मुलांसाठी काम करणारी , त्यांच्यासाठी मदतगट चालवणारी मृण्मयी मुलांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून खूप छान बोलतं करते आणि या विषयावर तिच्या युट्युब वरच्या व्हिडीओज मधून खूप छान बोलतेही !! चला तर जाणून घेऊया तिच्याचकडून या दुसऱ्या बाजू विषयी आपल्या सेल्फलेस पॅरेंटिंगच्या आजच्या भागात. 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi PodcastBy Shilpa Inamdar Yadnyopavit

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

2 ratings