Share माध्यम संशोधन संवाद
Share to email
Share to Facebook
Share to X
केस स्टडी ही पद्धत वैद्यकीय, व्यवस्थापन या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणाच वापरली जाते. परंतु माध्यम अभ्यासातदेखील तिचा मोठा उपयोग होऊ शकतो. केस स्टडी म्हणजे काय, कोणत्या प्रकारच्या विषयांसाठी ही पद्धत अधिक उपयुक्त आहे त्याची चर्चा या भागात केली आहे.
माध्यम संशोधनात आशय निर्मितीप्रक्रिया, तिचे विविध घटक, त्यांतील परस्परसंबंध समजून घेणे याला विशेष महत्त्व आहे. तसेच आशय आस्वाद पद्धती कोणकोणत्या असतात, त्यांवर आस्वादक कसे व्यक्त होतात याचाही वेध घेणे माध्यम संशोधकांना महत्त्वाचे वाटते. त्यासाठी क्षेत्रीय निरीक्षण ही पद्धत उपयुक्त ठरू शकते. त्याविषयी या भागात जाणून घेऊयात.
गुणात्मक संशोधनपद्धतींच्या अंतर्गत विषयकेंद्री गटचर्चा (फोकस ग्रुप डिस्कशन) हीदेखील माध्यम संशोधनात अनेकदा वापरली जाणारी पद्धत आहे. विशेषतः आस्वादकांची माध्यमआशयासंबंधीची मते आणि त्यामागील कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी तिचा उत्तम उपयोग केला जाऊ शकतो.
अनेक संशोधनांमध्ये सखोल मुलाखतींद्वारे तथ्य संकलन केलेले आढळते. त्याचे कारण असे की गुणात्मक संशोधन पद्धतीमुळे मिळणाऱ्या लवचिकतेचा उत्तम उपयोग करून विषयाशी संबंधित तज्ज्ञ व्यक्तींकडून थोड्या काळात खूप जास्त संकलन करता येते. मात्र ऐकताना वाटते तेवढी ती पद्धत सोपी नाही. शास्त्रीय संशोधन पद्धत म्हणून मुलाखती घेताना कोणती काळजी घ्यायची, त्याद्वारे तथ्यसंकलन कसे करायचे ते या भागात सविस्तर, व नेहमीप्रमाणे सोदाहरण सांगितले आहे.
संख्यात्मक संशोधनपद्धती किंवा तथ्य संकलन पद्धती पाहिल्यानंतर आता गुणात्मक पद्धतींचा परिचय आपण करून घेणार आहोत. गुणात्मक पद्धती कधी वापराव्या, त्या पद्धतींचा कसा उपयोग करून घ्यावा, त्यांची वैशिष्ट्ये काय या मूलभूत मुद्द्यांची चर्चा या भागात केली आहे. तसेच प्रमुख चार प्रकारही सांगितले आहेत. त्यांपैकी एकेका प्रकाराची सविस्तर चर्चा यापुढील भागांमध्ये आपण करणार आहोत.
संख्यात्मक तथ्य संकलन पद्धतीतील प्रायोगिक संशोधन ही महत्त्वाची पद्धत आहे. उपयोजित संशोधनासाठी ती अत्यंत उपयुक्त ठरते, कारण त्यातून विविध घटकांमधील कार्यकारण संबंध शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध करता येऊ शकतो. माध्यम संशोधक सर्वेक्षण किंवा आशय विश्लेषण यांच्याइतकी ही पद्धत वापरत नसले तरी तिचा वापर होणे का आवश्यक आहे, व तो कसा करायचा ते या भागात सांगितले आहे.
या भागात दोन उदाहरणे दिली आहेत. एक आहे एका महाकाय आंतरराष्ट्रीय अभ्यासाचं. दुसरं आहे एका छोट्या काल्पनिक अभ्यासाचं. आशय विश्लेषणाच्या सर्व पायऱ्या समजायला त्यातून मदत होईल. विश्लेषणाची चले, त्यांची वर्गवारी, संकेतनाची पद्धत अशा अनेक संकल्पनांचा परिचय या भागात होईल.
ज्या अभ्यासाचे उदाहरण घेतले आहे त्याचा दुवा देत आहे. http://europeanelectionstudies.net/wp-content/uploads/2012/06/codebook-contextual.pdf
आशय म्हणजे काय? फक्त विचार, की भाषा की रूपबंध, सादरीकरणाची पद्धती? या आणि अशा इतर प्रश्नांची उत्तरे या भागात मिळतील. त्याचबरोबर आशय विश्लेषणाचे एकक कसे ठरवायचे, नमुना प्रातिनिधिक व्हावा यासाठी नमुन्याच्या आकाराइतकाच कालावधीचा विचार करणे का आवश्यक आहे ते या भागात सांगितले आहे. नेहमीप्रमाणे प्रत्येक मुद्द्याची उदाहरणेदेखील दिली आहेत.
आशय हा माध्यम व्ययवहाराचा आत्मा आहे. त्यामुळे अर्थातच माध्यमांच्या आशयाचे विश्लेषण हा माध्यम संशोधनाचा महत्त्वाचा घटक आहे. संख्यात्मक पद्धतीशास्त्राच्या अंतर्गत सर्वेक्षणाएवढीच वापरली जाणारी संख्यात्मक तथ्य संकलन पद्धती म्हणजे आशय विश्लेषण. माध्यम व्यवहार समजून घेण्यासाठी आशय विश्लेषणाचा विविध प्रकारे कसा उत्तम उपयोग होऊ शकतो ते या भागात सांगितले आहे.
प्रश्नावलीसंबंधीच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात प्रतिसादकांची मते, प्राधान्य, मूल्यमापन इ. जाणून घेण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरता येतात ते सांगितलं आहे. Likert Scale, Sematic Differential Scale, Linear Numeric Scale अशा साधनांची अगदी सोप्या शब्दांत ओळख करून दिली आहे. या श्रेणी कशा पद्धतीने वापरता येतात ते सोदाहरण स्पष्ट केलं आहे.
ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटते का, आणखी कोणत्या विषयांचा कशा पद्धतीने या पॉडकास्टमध्ये समावेश झालेला तुम्हाला आवडेल त्याविषयी [email protected] या पत्त्यावर जरूर कळवा.
The podcast currently has 22 episodes available.