Sadhguru Marathi

#079 - अनिर्बंध शारीरिक संबंध ठेवल्यानं काय होतं? | (Anirbandh Sharirik Sambandh)


Listen Later

प्रश्न: दुसरा एक विषय अतिशय संवेदनशील आहे पण, त्यावर फार काही बोलल जात नाही, तो आहे, कॅज्युअल रिलेशनशीप, जे या सुंदर वयात निर्माण होतात, ज्यात आम्ही आहोत, आज तरुण शारिरीक संबंध ठेवतात, पण या नात्यांमध्ये भावनांची कमतरता असते, आम्हाला या विषयावर तुमच मत …. मत जाणुन घ्यायचय. जर लोक आपल्या मर्जीने असे संबंध निर्माण करतात, तर काय हे योग्य आहे, किंवा याला काय समजायच?

सदगुरू: तुमच्या शरीराला लाखॊं वर्षांपुर्वीच्या तुमच्या पुर्वजांच्या त्वचेचा रंग ही आठवतोय., त्याला अजुनही आठवतय, ते विसरलेल नाहीये. तर, ज्याला तुम्ही माझ शरीर म्हणताय, ते आठवणींचा खुप मोठा संग्रह आहे, हो ना? तुमच्या डोक्यात साठलेली स्मृती, त्यामानाने खुप कमी आहे, तुमच्या शरीरात असलेली स्मॄती, तिच्यात उत्क्रांती विकासाच्या स्मृती आहेत. अनुवांशिक स्मृती आहेत, कार्मिक स्मृती आहेत. व्यक्त आणी अव्यक्त स्तरावरील स्मृती आहेत. अशा पुष्कळ स्मुती आहेत. तुम्हाला वाटत की आता तुम्हाला चालायला येत, पण ते केवळ ह्यामुळे की, तुमच्या शरीराकडे त्या स्मृती आहेत, जर तुमच शरीर त्या विसरून गेल, तर तुम्ही चालू शकणार नाही. ......................
...............................तर, तुम्ही स्वत:ला काय बनवू इच्छिता? तुम्ही स्वत:ला एक सेक्शुअल सुपरनोव्हा बनवू इच्छिता का?…. कारण, मी म्हणतोय, काही लोकांचा असा विचार असू शकतो. ते त्यांच्यावर आहे. पण तुम्ही तुमच्या आयुष्याचं काय करू इच्छिता, हे तुम्हाला निश्चित कराव लागेल. जर तुम्ही हे निश्चित केल आहे, तर हे फार महत्वाच आहे की तुम्ही अजाणतेपणी मोठ्या प्रमाणात स्मृती गोळा करु नयेत. कारण असं केल्याने तुम्ही… नंतर तुम्ही पहाल की तुमच्यासाठी शांत असणं, आनंदी असणं खुप कठीण होऊन जाईल. भले छान छान गोष्टी घडत असतील, कारण शरीरात गोंधळलेल्या आठवणींचा साठा आहे. जेव्हा या समान दुसरं काही जर आलं, तर शरीरात गोंधळाची उलथापालथ होऊ लागते. कदाचित याचा प्रभाव तुमच्या मनावर होणार नाही, केवळ शारिरिकदृष्ट्या, हे होत राहिल, म्हणून ही निवड प्रत्येकानं करायची आहे. हा काही….नैतिकतेचा प्रश्न नाहिये, हा प्रश्न आहे, शहाणपणाने जगण्याचा.
मराठी सुविचार

⁠SadhguruApp⁠ (डाउनलोड करा) - ⁠http://onelink.to/sadhguru__app​​​⁠

अधिकृत सद्गुरू वेबसाइट - ⁠http://isha.sadhguru.org⁠​​​ 

इनर इंजिनियरिंग मराठी ऑनलाईन - ⁠https://sadhguru.org/IE-MR⁠

माती वाचवा मोहीम - ⁠https://savesoil.org⁠

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Sadhguru MarathiBy Sadhguru Marathi